Published November 30, 2025 | Version v1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीतील नेतृत्त्वगुण व तत्त्वांचा स्टार्टअप्सच्या विस्तारासाठी वापर: 'स्वराज्य ते स्केलअप' एक संकल्पनात्मक अभ्यास

  • 1. सहाय्यक प्राध्यापक, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Contributors

Description

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांवर आधारित असलेला हा संकल्पनात्मक शोध-अभ्यास, त्यांच्या काळातील प्रजा-केंद्रीत मराठा साम्राज्याच्या स्थापनेत त्यांच्या रणनीतिक सैन्य कौशल्य, दूरदर्शी दृष्टिकोण आणि लोककेंद्रित शासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. महाराजांचा वारसा आजही प्रेरणादायक आहे आणि त्यांच्या नेतृत्व तत्त्वांचा आधुनिक स्टार्टअप्सच्या वृद्धी आणि शाश्वत विकासाकरिता कसा उपयोग करता येईल, हे या अभ्यासात तपासले आहे. या शोधनिबंधात महाराजांच्या धैर्य, दूरदृष्टी, निर्णायकता आणि सार्वजनिक कल्याणासाठी समर्पण या प्रमुख नेतृत्व गुणांचा आजच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये कसा उपयोग करता येईल, हे स्पष्ट केले आहे. नवीन व्यवसाय उपक्रम म्हणून स्टार्टअप्सना भांडवल उभारणे, बाजार स्पर्धा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि संसाधन व्यवस्थापनासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि टिकाऊ व्यवसाय वाढ साध्य करण्यासाठी, महाराजांच्या नेतृत्व मॉडेलवर आधारित एक संकल्पनात्मक चौकट प्रस्तावित केली आहे.अभ्यासात दाखवण्यात आले आहे की महाराजांची नेतृत्व तत्त्वे आधुनिक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या गनिमी युद्ध तंत्र, किल्लेबंदी, आणि प्रशासकीय सुधारणांचा अभ्यास करून आपल्याला मर्यादित संसाधनांद्वारे देखील मोठे उद्दिष्ट साधता येतात, हे शिकण्यासारखे आहे.  महाराजांच्या स्वराज्य आणि आजच्या स्टार्टअप्समधील समान धागा शोधून, हा अभ्यास दर्शवतो की रणनीतिक विचार, नवकल्पनात्मक समस्या सोडवणे आणि समुदाय सहभाग या तत्त्वांचा वापर करून यशस्वी स्टार्टअप्स संकल्पनात्मक दृष्टया उभारला जावू शकतो. या अभ्यासाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक यशावर आधारित एक नेतृत्व मॉडेल विकसित करणे आहे, जे आधुनिक उद्योजकांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करू शकेल. अनुकूलता, नवीन विचार आणि लोककेंद्रित दृष्टिकोण यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे मॉडेल, शिवाजी महाराजांच्या शासन आणि सैनिकी रणनीताचा मुख्य गाभा होता. भूतकाळातील नेतृत्व, तत्त्वे आणि आजच्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या गरजांमधील समानता दर्शवून, हा शोधनिबंध स्टार्टअप्ससाठी दीर्घकालीन यश आणि “स्वराज्य ते स्केलेबिलिटीसाठी” एक नवीन दृष्टिकोन सार्वत्रीक करण्याचा प्रयत्न करतो.

 

Files

x171107.pdf

Files (784.3 kB)

Name Size Download all
md5:c7d1e985e4de7856155f2b1195dd6c79
784.3 kB Preview Download