Published November 30, 2025 | Version v1

जैवविविधता संवर्धन एक पर्यावरणीय आव्हान

  • 1. श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर (चौ.) ता.- लाखनी जिल्हा भंडारा (महा.)

Contributors

Description

भारतात जैवविविधतेचे प्रमाण जगाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आणि ते एकूण जैवविविधतेच्या ७-८% इतके आहे. जगाच्या २.४% भूभागावर भारत स्थित आहे, पण इथे ७-८% जैवविविधता आढळते. जैवविविधतेच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर १७ महाविविधता केंद्रापैकी एक आहे असे CI आणि UNEP यांनी सांगितले आहे. भारतात ५५,०४८ पेक्षा जास्त वनस्पती आणि १,०३,२५८ पेक्षा जास्त प्राण्यांच्या प्रजाती आहेत. तर भारतात मध्ये ४ जैवविविधता हॉटस्पॉट असून ज्यामध्ये हिमालय, इंडो-बर्मा, पश्चिम घात आणि सुंदरबन चा समावेश होतो. भारतात ३३% पेक्षा जास्त स्थानीय वनस्पती प्रजात आहेत. जगात १५००० फुलांच्या वनस्पती आहेत, जे जगातील एकूण संखेच्या ६% आहेत,त्यापैकी अंदाजे १,५०० वनस्पती प्रजाती धोक्यात आहेत. जगातील प्राण्यांच्या सुमारे ६.५% प्रमाण असलेल्या भारतात ९१००० प्राण्यांच्या प्रजाती आहेत. यामध्ये ६०,००० कीटकांच्या प्रजाती, २,४५६ माशांच्या प्रजाती, १,२३० पक्षांच्या प्रजाती, ३७२ सस्तन प्राणी, ४४० हून अधिक सरपटणारे प्राणी आणि २०० उभयचर प्राणी यांचा समावेश आहे. ज्यांचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम घाटात आढळून येते. पशुधनाबाबाद भारतात विविधता दिसून येते भारतात मेंढ्यांच्या ४०० जाती, गायींच्या २७ जाती आणि शेळ्यांच्या २२ जाती आढळून येतात. भारतात आशियातील काही दुर्मिळ प्राण्यांची महत्वाची लोकसंख्या आहे, जसे कि बंगाल फॉक्स, आशियायी चिता, संगमरवरी मांजर, आशियायी सिंह, भारतीय हत्ती, आशियायी जगली गाढव, भारतीय गेंडा, गौर, जंगली आशियायी पाण्यातील म्ह्यस इ. परंतु मानवी क्रीयाकल्पांच्या अतिजास्त हस्तक्षेपा मुळे व हवामानात होणाऱ्या बदलांमुळे यातील बहुतेक प्रजाती ह्या धोक्याच्या पातळीत आहेत.

 

Files

x171103.pdf

Files (590.7 kB)

Name Size Download all
md5:97c28c7b1adbefe64bcba42a93e46ca6
590.7 kB Preview Download