Published October 31, 2025 | Version v1
Journal article Open

पालांदूर जमीनदारी देवस्थान

  • 1. सहा. प्राध्यापक, इतिहास विभाग,राजे रामराव महाविद्यालय, जत

Contributors

Description

गोषवारा:

          पालांदूर जमीनदारी देवस्थानाला जमीनदारी परिसरात विशेष असे महत्त्व आहे.हे देवस्थान पालांदूर जमीनदारी परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे.या धार्मिक स्थळावर प्राचीन काळापासूनची आदिवासी व इतर ग्रामीण लोकांच्या परंपरेची जपणूक करण्यात आलेली आहे.या धार्मिक स्थळाची स्थापना पालांदूर जमीनदारीचा पहिला जमीनदार खोडबासिंह राऊत यांनी गोपनीय पद्मिनी राय रुक्मिणीदेवीच्या नावाने १७ व्या किंवा १८ व्या शतकात केली. या देवीच्या नावाने दुर्गा, काली व चंडी या देवींची पूजा करण्यात येते.त्याचबरोबर सतीमाता व  शुंभ-निशुंभ या  दैवतांचे पूजन करण्यात येते. मातामाय पूजा, दंतासूरी पूजा, डवरा पूजा, दुधारा पूजा, संजोरी पूजा, शेवार्‍या देव पूजा, रोगराई निवारण पूजा इत्यादी निसर्ग पूजा या धार्मिक स्थळाशी संबंधित आहेत. जमीनदारीच्या काळापासून आदिवासी हलबा/हलबी जमातीच्या डंडार नृत्याची परंपरा या धार्मिक स्थळावर चालू आहे. भजनासाठी हे देवस्थान पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. इ.स.१९५४ पासून दरवर्षी दिवाळी सणातील भाऊबीजेच्या दिवशी नाटक असते. पूर्वी ड्रामा, तमाशा, सोंगाडे इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक स्थळाच्या उत्सवावेळी भरविण्यात येणाऱ्या यात्रेत सादर करण्यात येत असत. कबड्डी या खेळाची स्पर्धा दरवर्षी उत्सवाच्या वेळी घेण्यात येते. पूर्वी कुस्तीची स्पर्धा होत होती. या धार्मिक स्थळावर आदिवासी व इतर ग्रामीण लोकांच्या ऐतिहासिक काळापासूनच्या धार्मिक व सांस्कृतिक प्रथा-परंपरा दिवाळी सणातील उत्सवाच्या वेळी बघता येतात

Files

x55.pdf

Files (385.5 kB)

Name Size Download all
md5:2b154514e58822f29bf149d3f17543ba
385.5 kB Preview Download