भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हरित क्रांती मुळे झालेल्या बदलाचा अभ्यास
Authors/Creators
- 1. संशोधक विद्यार्थी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, छ.संभाजीनगर
- 2. संशोधन मार्गदर्शक, राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना
Contributors
Editor:
Description
सारांश (Abstract)
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा कणा महत्त्वाची भूमिका बजावतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळात अन्नधान्याची तीव्र टंचाई, सिंचनक्षेत्रातील घट आणि कमी उत्पादनक्षम बियाणे या समस्यांना उत्तर म्हणून भारतात 1966-67 पासून हरित क्रांतीची सुरुवात झाली. उच्च उत्पादन देणारी सुधारीत बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके, आधुनिक यांत्रिकीकरण आणि सिंचन व्यवस्था यांच्या वापरामुळे देशातील अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. विशेषतः गहू व तांदूळ उत्पादनात भारताने उल्लेखनीय प्रगती साधली व कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर स्वयंपूर्ण झाले.हरित क्रांतीमुळे बहुपीक पद्धतीचा अवलंब, रोजगारनिर्मिती, आधुनिक साधनांचा वापर, सावकारीतून मुक्तता अशा सकारात्मक गोष्टी घडल्या. परंतु याच क्रांतीमुळे काही तोटेही दिसून आले—जसे रासायनिक खतांचा अतिरेक, जमिनीचा ऱ्हास, प्रदेशनिहाय असमतोल विकास (विशेषतः पंजाब-हरियाणा पुरते मर्यादित फायदे), कृषी खर्चातील वाढ आणि मजूर विस्थापन. संशोधनात या सर्व घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करून हरित क्रांतीचे परिणाम, मर्यादा आणि पुढील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले आहे.
Files
x54.pdf
Files
(394.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:a842648a9bd98ca1778ee2663a08c513
|
394.9 kB | Preview Download |