लोकसाहित्य व सांस्कृतिक ओळख
Authors/Creators
- 1. सहाय्यक प्राध्यापक , मराठी विभाग.स.ब.खाडे महाविद्यालय कोपार्डे
Contributors
Editor:
Description
गोषवारा
भारत हा विविधतेमध्ये एकता असणारा देश आहे. भारतामध्ये अनेक प्रांतातील अनेक भाषा आजही विकसित असलेल्या पाहायला मिळतात. या भाषांना ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरा पिढ्यानपिढ्या संक्रमित करण्याचे काम साहित्याने केले आहे , म्हणूनच साहित्य हे संस्कृती जतनाचे महत्त्वपूर्ण मध्यम आहे. महाराष्ट्र ही याला अपवाद नाही. महाराष्ट्रात १८ पगड जातीचे लोक राहतात. या सर्वांची स्वताची अशी ओळख आणि संस्कृती आहे. महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे ' बारा कोसावर पाणी आणि वाणी बदलते'. अगदी याच प्रमाणे संस्कृती आणि साहित्य निर्मित होते. म्हणूनच मराठी साहित्याचा अभ्यास करताना लोकसाहित्य या प्रकारचा अभ्यास करणे म्हणजे पारंपारिक संस्कृतीची ओळख करून घेणे असे म्हटले तर योग्यच ठरते. 'मानव हा समाजशील प्राणी आहे' असे अॅरिस्टोटल या शास्त्रज्ञानी म्हटले आहे. त्याच समाजात राहताना मानवाने स्वताचा जीवनक्रम आनंददायी जावा या करिता, अनेक सण -उत्सव , यात्रा - जत्रा , चाली -रिती यांची निर्मिती केली. याचे एकापिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले. हे संक्रमण सुरुवातीला मौखिक स्वरूपाचे तर कालांतराने ते लिखित स्वरूपाचे बनले. यातून साहित्याला अनेक प्रेरणा मिळत गेल्या व लोकसाहित्य उदयास आले. हे लोक साहित्य संस्कृती जतनाचे व प्रसारणाचे मध्यम म्हणून कार्य करू लागले. त्कालीन समाजजीवन , आर्थिकता , विचारसरणी या सर्वांचे प्रतिबिंब या लोकसाहित्याने उमटविण्याचे काम केले. केवळ एवढेच नाही तर प्रसंगी समाजप्रबोधनाचे मध्यम म्हणून सक्षमतेने उभे राहिले. म्हणूनच लोकसाहित्य आणि संस्कृती या वेगवेगळ्या परिभाषा असल्या तरी परस्पर पूरक आहेत..
Files
x20.pdf
Files
(561.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:238c33ad7fa2bd425d70041d2d79fd37
|
561.6 kB | Preview Download |