Published October 31, 2025 | Version v1

स्त्रीवादी साहित्यिक दृष्टिकोन

  • 1. मराठी विभाग प्रमुख- स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे

Contributors

Description

घोषवारा :-

           सन २००५ मध्ये प्रकाशित झालेली कविता महाजन यांची 'ब्र' ही कादंबरी अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. कादंबरी लिहिताना लेखिकेने स्त्रीवादी दृष्टिकोनातून आदिवासी जमातीमधील राजकीय वातावरणाची मांडणी केली आहे. लेखिकेने कादंबरीमध्ये महिला सरपंचावर येणारे अविश्वास ठराव हा विषय मांडला आहे. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी लेखिका स्वतः आदिवासी गावातील वेगवेगळ्या पाड्यावर जाऊन महिला ग्रामपंचायत सदस्यांना भेटते. त्यांची मुलाखत घेते. यामधून विचित्र व कल्पनेच्या पलीकडील वास्तव तिच्या निदर्शनास येते. स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रियांना अनेक प्रसंगांना कसे सामोरे जावे लागते. अनेक प्रसंगांना कसे तोंड द्यावे लागते.यात पुरुष आणि समाज स्त्रीला कशी वागणूक देतात. याकडे ही कादंबरी लक्ष वेधताना दिसून येते. लेखिकेने या कादंबरीच्या माध्यमातून स्त्री जीवनाला नवा आयाम नवा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी पाड्यातील स्त्रीची जीवनशैली, ग्रामपंचायत पातळीवरचे स्त्रियांचे राजकारण मांडताना स्वयंसेवी संस्थांमधील राजकारण आणि स्त्री पुरुष संबंधाचे राजकारणही येथे मांडले आहे. सामान्य गृहिणी ते एक सामाजिक कार्यकर्ती असलेल्या स्त्रीचा प्रवास विविध प्रसंगांमधून उलगडून दाखवताना आदिवासी भागातील स्त्री जीवनाचे वास्तव मांडणारी ही कादंबरी निश्चितच आपल्याला डोळे उघडून जगाकडे बघण्याची जाणीव करून देईल. प्रस्तुत शोधनिबंधात आदिम समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि यातून आत्मनिर्भर झालेल्या स्त्रीचा प्रवास या सर्व बाबींचा वेध कविता महाजन यांच्या 'ब्र' कादंबरीच्या आधारे स्त्रीवादी दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे.

Files

x15.pdf

Files (515.9 kB)

Name Size Download all
md5:723e624c57d13e8ca8cf6bde565e0031
515.9 kB Preview Download