विकसित भारत 2047- (भाषा,राज्यभाषा -मराठी)
Authors/Creators
- 1. मराठी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.महात्मा गांधी विद्यामंदिर,संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय स्वायत्त मालेगाव कॅम्प मालेगाव (जिल्हा - नाशिक )
Contributors
Editor:
Description
सारांश
विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनात भाषेचे, विशेषतः राज्यभाषा मराठीचे महत्त्व अत्यंत मोलाचे आहे. भाषा ही मानवी विचार, भावना, संस्कार आणि ज्ञान प्रसाराचे माध्यम असून सामाजिक-सांस्कृतिक विकासाची पायरी मानली जाते. मराठी भाषा व साहित्य मानवी मूल्ये, सामाजिक वास्तव, ग्रामीण जीवन, शेतकरी संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि नैतिकतेचे सामर्थ्यपूर्ण चित्रण करतात. बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, सावरकर यांसारख्या कविग्रंथांनी मानवी मन, संवेदना आणि सकारात्मक जीवनदृष्टी घडवण्याची प्रभावी भूमिका बजावली आहे. शेतकरी, कष्टकरी, महिलावर्ग व दुर्बल घटकांचे वास्तव दर्शविणाऱ्या कथा-कवितांमधून सामाजिक न्याय, समानता आणि विकासाची आवश्यकता अधोरेखित होते.
मराठी साहित्याचे मूल्यशिक्षणातील योगदान विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास तसेच राष्ट्रनिर्मितीस हातभार लावते. संत परंपरा, वारकरी चळवळ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, फुले-आंबेडकर विचारसरणी यांमधून भारतीयतेची, लोकशाहीची आणि सामाजिक समतेची भक्कम पायाभरणी दिसून येते.
या सर्व घटकांच्या आधारे मराठी भाषा आणि साहित्य हे विकसित भारत 2047 च्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि मानवी मूल्याधिष्ठित विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देतात. भाषिक-सांस्कृतिक संपन्नता, सामाजिक जाणीव, आणि मानवकेंद्री विचार हीच भावी भारताची खरी ताकद ठरणार आहे.
Files
x171032.pdf
Files
(382.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:7d0a34eb930eb2ecdc276e881f062443
|
382.4 kB | Preview Download |