Published October 31, 2025 | Version v1

मोखाडा तालुक्यातील पाणी समस्या : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक जीवनाचा अभ्यास

  • 1. लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मोखाडा, जि. पालघर

Contributors

Description

गोषवारा

मोखाडा तालुका हा पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी बहुल भाग आहे. या तालुक्याची भौगोलिक रचना ही डोंगराळ व दऱ्या-खोऱ्या आणि जंगलांनी वेढलेला असून पावसाच्या अनियमिततेमुळे पाणीटंचाई ही गंभीर समस्या आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, परंतु पावसाचे पाणी हे साठवणूक न झाल्यामुळे उन्हाळ्यात पिण्यासाठी, घरगुती वापरण्या साठी, शेतीसाठी पाण्याची कमतरता निर्माण होते. परिणामी आदिवासी समाजाला दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.पाणी समस्येमुळे शेती उत्पादन घटते, रोजगाराची टंचाई निर्माण होते आणि आर्थिक जीवन अस्थिर होते. अनेक वेळा पाणीटंचाईमुळे पुरुष वर्ग स्थलांतरित मजुरीकडे वळतो, ज्याचा परिणाम कुटुंबाच्या सामाजिक रचनेवर आणि स्त्रियांच्या जबाबदाऱ्यांवर होतो. पाणी आणण्यासाठी महिलांना व मुलींना लांब अंतर चालावे लागते, त्यामुळे त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होतो.या अभ्यासातून मोखाडा तालुक्यातील पाणी समस्या ही केवळ नैसर्गिक किंवा तांत्रिक मर्यादा नसून ती आदिवासी समाजाच्या आर्थिक विकास, सामाजिक स्थिती व जीवनमानाशी घट्टपणे जोडलेली आहे हे स्पष्ट होते. या समस्येवर उपाय म्हणून जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण, लहान सिंचन प्रकल्प व शासकीय योजनांचा प्रभावी वापर आवश्यक आहे.

Files

x171019.pdf

Files (417.4 kB)

Name Size Download all
md5:88016fddfa797b5190dfce20369bff28
417.4 kB Preview Download