Published November 20, 2025 | Version v1

किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या 'आकलन' या पुस्तकातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे नव्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण करणारे निवडक लेख

  • 1. उमरगा, जि.धाराशिव
  • 2. जवाहर महाविद्यालय अणदूर, या.तुळजापूर, जि.धाराशिव

Description

अमर हबीब हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक आणि किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते आहेत. ते समाजातील विषमता व अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवतात. तसेच सामाजिक न्यायासाठीही आग्रही असतात. ते शेतकरी व महिलांचे अधिकार या विषयावर काम करतात. किसानपूत्र आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन झाले होते त्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. मुक्त पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी वृत्तपत्रे, मासिके आणि समाज माध्यमाद्वारे अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवलेला आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून झालेली आंदोलने, 1974 साली झालेले मराठवाडा विद्यार्थ्यी आंदोलन, 1974-75 च्या काळात झालेल्या आदिवासी चळवळी, 1975 ते 77 या काळातील आणीबाणी, 1977 ते 1980 या कार्यकाळात झालेली छात्र युवा संघर्ष वाहिनी, 1980 चे मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, 1980 पासून शेतकरी संघटनेचे झालेली विविध आंदोल,ने 2015 पासून सुरू झालेले किसानपुत्र आंदोलन, या सर्व आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. आणीबाणीत तर त्यांना 19 महिने तुरुंगवासही भोगाव लागला होता. आंबेजोगाई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘भूमी सेवक’ या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीवर तसेच अभ्यास समितीवर ही त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहून समाजातील तात्कालीक समस्यावर भाष्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. साहित्य चळवळीतही त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी अनेक शासकीय व बिगर शासकीय समितीवर सुद्धा काम केलेले आहे. त्यांनी आपल्या वैचारिक पुस्तकांमधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यावर चिंतन करून उपाययोजना सुचविल्या आहेत. याच वैचारिक पुस्तकांमधील ‘आकलन’ या पुस्तकातील शेतकरी विषयक लेख अभ्यासात आहोत.

Files

S064059.pdf

Files (639.0 kB)

Name Size Download all
md5:95688c4e1be63acd2b23f0dc4474001a
639.0 kB Preview Download