Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

१८७१ चा "गुन्हेगार जमात कायदा"आणि पारधी समाज जीवन

  • 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छ. सांभाजीनगर

Description

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षाहून अधिक वर्ष लोटली आहे, संविधानातील मानवी अधिकारानुसार आपण बघतो की भारत देशामध्ये सामाजिक  लोकशाही, समता, स्वातंत्त्त्र्य, बंधुता,  न्यायिक अधिकार  हे भारतातील सर्व नागरिकांना मिळाले आहेत. आज  प्रत्तेक भारतातील नागरिकांना आपापले हक्क आणि अधिकार माहिती आहे. आणि ते अधिकार प्रत्तेक मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाळताना दिसतो. प्रात्तेक व्यक्तीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना दिसतो. आज स्वतंत्र भारतातील   मानवी हक्क आणि अधिकार जे  मुख्य प्रवाही शिक्षित समुदाय उपभोगत आहेत  ते अधिकार आजही काही जाती-जमातींना मिळालेले दिसून येत नाही. किंवा आज देखील या भटक्या विमुक्त जमाती मधील व्यक्ती किंवा समूह हा मुक्तपणे संचार करताना दिसून येत नाही. कधी देवाच्या नावाने, कधी धर्माच्या नावाने, तर कधी गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जातीच्या नावाने  समाजामध्ये भेदभावाचे वातावरण आज देखील आपणास  दिसून येते, त्याचबरोबर उच्च आणि प्रतिष्ठित समजला जाणारा समाज आजही या समाजाबरोबर एकत्रित राहणे पसंत करत नाही.

Files

S064056.pdf

Files (519.0 kB)

Name Size Download all
md5:7b9ff8e4b625a740fc536d8e1545c40e
519.0 kB Preview Download