महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील लघु उद्योगाचे महत्त्व
- 1. सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड
- 2. संशोधक विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
Contributors
Editor:
Description
कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात लघु उद्योगाचे योगदान महत्त्वाचे असते. महाराष्ट्र सारख्या प्रगतिशील राज्यात लघु उद्योगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर स्वरूपाची होत चालली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात भांडवलाची कमतरता असल्यामुळे मोठे उद्योग स्थापन करणे कठीण जाते, त्यामुळे कमीत कमी भांडवलामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे प्रामुख्याचे ठरते. त्यामुळे कमी भांडवलामध्ये लघुउद्योग स्थापन करणे शक्य असल्यामुळे, लघुउद्योग महाराष्ट्रासारख्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या देशाचे आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरळीत असते त्या देशातील लोकांना उच्च प्रकारचे जीवनमान प्रदान होत असते. आर्थिक विकास हा त्या राज्याने स्वीकारलेल्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो. देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा उत्पादन, उपभोग आणि वितरण इत्यादी आर्थिक व्यवहाराची व्यवस्थापन व नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. महाराष्ट्रातील लघुउद्योग अकार्यक्षम आहेत असे अनेकदा संबोधले जाते, परंतु महाराष्ट्रातील लघुउद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून आर्थिक स्थिती उंचावण्याचे काम करतात, त्यामुळे महाराष्ट्रातील लघुउद्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो.
Files
x171047....pdf
Files
(613.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:b92157900893703b52e5184591efab7c
|
613.5 kB | Preview Download |