विजय जावळे यांच्या साहित्यातील ग्रामसंस्कृती आणि मूल्यविचार
Description
‘खेड्यातील जीवनशैली, परंपरा, आणि त्यातून निर्माण होणारे नैतिक विचार. ग्रामीण संस्कृतीत, निसर्गावर आधारित जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धती, आणि पारंपरिक चालीरीतींना महत्त्व दिले जाते. यातूनच समता, न्याय, आणि सामाजिक बांधिलकीचे विचार रुजतात.ग्रामीण महाराष्ट्रातील परिवर्तनांचा मागोवा... १९६० पासून ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह मराठी साहित्याचा जो पगडा आहे त्यात साहित्यिक विजय जावळे हे नाव प्रामुख्याने येते . ग्रामीण जीवनाचं वास्तव दर्शन त्यांनी आपल्या ‘रितं गाव,खांदेमळणी आणि इतर कादंबऱ्यांतून तसेच थांतून घडवले. विशेष म्हणजे ग्रामीण साहित्याची संकल्पना मांडून, परंपरा दाखवून, समिक्षेसाठी उपयुक्त असे निकषही त्यांनी रुजवले, त्यांच्या ललित लेखनातून आणि समिक्षेतून त्यांची ग्रामजीवनाबद्दलची ओढ, ग्रामीण संस्कृतीत होणाऱ्या विघटनाबद्दलची खंत सातत्याने दिसते. ‘ग्रामसंस्कृती’त होत गेलेली स्थित्यंतरे वाचकांसमोर मांडतात. सर्वसामान्य वाचकवर्ग डोळ्यांसमोर असल्यानेच बहुधा सोप्या, सुटसुटीत भाषेत ग्रामीण संस्कृतीची निर्मिती कशी झाली येथपासून ते आज ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास का होतो आहे येथपर्यंतचा मागोवा विजय जावळे यांनी घेतला आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या शब्दांतील नाते स्पष्ट करीत संस्कृती हा मानवी मूळ स्वभावाचाच एक भाग कसा आहे हे विजय जावळे स्पष्ट करतात. संस्कृती चांगल्या कृतींची आणि गतिमान असते. स्वास्थ्य मिळाल्यावरच माणूस संस्कृती निर्माण करु शकतो हे पहिल्या लेखातून स्पष्ट होते.