भारतीय कला, नाट्य, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील आदिवासी समाजाचे योगदान एक अभ्यास
Description
भारतीय समाजरचनेत आदिवासी (Adivasi/Tribal Communities) हा घटक सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा मानला जातो. आदिवासी समाज हे भारतीय संस्कृतीचे आद्य शिल्पकार असून त्यांच्या जीवनपद्धतीत कला, नाट्य, संगीत आणि लोकपरंपरा यांचा अविभाज्य समावेश आहे. आधुनिक भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आदिवासी कलांचा प्रभाव आढळतो. भारतीय संस्कृतीचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. या प्रदीर्घ इतिहासाच्या प्रवाहात आदिवासी समाज हा सर्वात प्राचीन आणि मूळ घटक मानला जातो. भारतीय संस्कृतीच्या सुरुवातीच्या पायावर आदिवासींची कला, नृत्य, नाट्य, संगीत आणि जीवनशैली यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या परंपरेतील जीवनदृष्टी ही निसर्गकेंद्री असून तिच्यात सामूहिकता, समता व श्रमसंस्काराचे दर्शन घडते. आजच्या आधुनिक भारतीय कलाक्षेत्रातही आदिवासी समाजाच्या अभिव्यक्तीची छाप स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे या संशोधनाचा हेतू आदिवासी समाजाचे सांस्कृतिक योगदान उलगडणे हा आहे.
Files
S064034.pdf
Files
(758.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:cab8ba1149cc523292b4ab20316a96cc
|
758.7 kB | Preview Download |