आदिवासी संस्कृती आणि कलाविष्कार
Description
संस्कृती ही मानवाच्या जीवनशैली, मूल्ये, विश्वास आणि प्रथा यांचे एकसंधित प्रतिबिंब आहे. जगभरात वैविध्यपूर्ण संस्कृती आपणास पाहण्यास मिळतात. संस्कृतीच्या विविधतेतून जगभरातील कला, भाषा, परंपरा व साहित्याची संपन्नता दिसून येते.
प्रत्येक मानवी समूहाची एक संस्कृती असते. संस्कृतीमुळे प्रत्येक समाजाचे एक वेगळेपण दिसून येते. संस्कृती ही व्यक्तीला, समाजाला आपुलकीची भावना, अभिमान व अस्मिता देते.
संस्कृती ही एक गतिमान व विकसित होत जाणारी संकल्पना आहे. ज्यामध्ये कला, भाषा, परंपरा, चालीरीती, संगीत, साहित्य आणि सामाजिक प्रथा यासह मानवी अनुभवांचे सर्व पैलू समाविष्ट आहेत. कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचा वारसा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो, म्हणून मानवी संस्कृती ही प्रवाही असल्यामुळे ती सातत्याने पण नकळतपणे थोडी थोडी बदलत जाते.
समाज व संस्कृती हे दोन घटक परस्पराश्रयी असून दोघांमध्ये दृढ समन्वय आढळून येतो. मानवी संस्कृतीविषयी अगदी मुळापासून जाणून घेण्यासाठी आदिवासींच्या संस्कृतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
Files
S064022.pdf
Files
(656.0 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:447b57a6dbf718494af50fc2eb24ed05
|
656.0 kB | Preview Download |