Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

गोंड चित्रकला :भारताची राष्ट्रीय ओळख

Description

‘गोंड चित्रकला’ ही भारताच्या आदिवासी सांस्कृतिक वारशातील एक महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कला आहे. मध्य भारतातील गोंड समाजाशी निगडित असलेली ही चित्रशैली निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याचं, श्रद्धेचं आणि जीवनदृष्टीचं दृश्य रूप मानली जाते. या कलेतील ठिपक्यांची रचना, लयबद्ध रेषा आणि निसर्गाशी जोडलेले विषय हे तिचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

पूर्वी घरांच्या भिंतींवर साजऱ्या होणाऱ्या या चित्रकलेचा आधुनिक कॅनव्हास, कापड, कागद आणि डिजिटल माध्यमांपर्यंतचा प्रवास अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. जनगढ सिंह श्याम यांच्या कार्यामुळे गोंड चित्रकलेला नवीन दिशा मिळाली, तर त्यांच्या पाठोपाठ शर्मन श्याम, दुर्गाबाई व्याम, भज्जू श्याम यांसारख्या समकालीन कलाकारांनी या परंपरेला नव्या सामाजिक आणि जागतिक संदर्भांतून समृद्ध केलं.

गोंड चित्रकलेला एप्रिल २०२३ मध्ये GI टॅग प्राप्त झाला, ज्यामुळे या पारंपरिक कलेला अधिक मान्यता, संरक्षण आणि जागतिक बाजारपेठेत स्थान मिळालं. NFT (Non-Fungible Token), डिजिटल गॅलरी, ऑनलाईन एक्झिबिशन्स आणि ग्राफिक पुस्तकांमधून ही चित्रशैली नव्या पिढीशी संवाद साधत आहे.

एकूणच, गोंड चित्रकला ही केवळ एक पारंपरिक चित्रशैली नसून, गोंड समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचं आणि निसर्गाभिमुख जीवनदृष्टीचं प्रभावी माध्यम आहे, जी काळानुरूप नव्या रूपांतरणातून अधिक व्यापक आणि सजीव होत आहे.

Files

S064021.pdf

Files (698.3 kB)

Name Size Download all
md5:789eb109893f1d256811f8b4a7386473
698.3 kB Preview Download