Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

आदिवासी समाज आणि संस्कृती

Description

               भारतीय समाज हा विविधतेने नटलेला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारी येथील लोकशाही समाजव्यवस्था आहे. या भारतीय समाज व्यवस्थेतीलच एक आदिवासी समाज आहे. जसे प्रत्येक समाजाचे सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक वेगळेपण आहे. तसे आदिवासी समाजाचेही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक आणि पारंपारिक वेगळेपण आहे हे आपल्याला लक्षात येते. आदिवासी समाज हा त्वरित सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेणारा आहे. निसर्गाच्या सानिध्यात रमणारा व स्वच्छंदपणे जीवन जगणारा समाज आहे. अबोल, भोळा, दैववादी व तेवढाच प्रामाणिक आहे. हा डोंगरदऱ्यात राहणारा समाज म्हणून परिचित असला तरी त्याचे स्वच्छ साधे राहणे व आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणे ही गोष्ट अनुकरणीय आहे. जल, जंगल, जमीन ही खरी आपली संपत्ती आहे. असे मानणाऱ्या या आदिवासी समाज व संस्कृतीचा थोडक्यात परिचय प्रस्तुत शोधनिबंधात करण्यात आला आहे.

Files

S064020.pdf

Files (675.6 kB)

Name Size Download all
md5:833384cd57a4bec29e70a247a658df27
675.6 kB Preview Download