भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींची भूमिका
Authors/Creators
- 1. जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको नांदेड.
Description
भारताचा स्वातंत्र्यसंग्राम हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा मानला जातो. या संघर्षामध्ये केवळ शहरी शिक्षित वर्ग, राजकीय नेते किंवा क्रांतिकारकच नव्हे, तर ग्रामीण, शेतकरी, कामगार आणि आदिवासी समाजानेही आपल्या जीवाची पर्वा न करता सक्रीय सहभाग नोंदविला. विशेषतः आदिवासी समाज हा स्वातंत्र्य चळवळीतील एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी घटक ठरला. ब्रिटिश सत्तेच्या विस्तारामुळे आदिवासी समाजावर थेट परिणाम झाला. जंगल कायदे, महसुली व्यवस्था, सावकारांचे शोषण आणि जबरदस्तीच्या मजुरीमुळे त्यांच्या परंपरागत जीवनपद्धतीचा पूर्णतः ऱ्हास झाला. शतकानुशतके जंगल व निसर्गाशी जोडलेला समाज आपली जमीन, शेती व उपजीविकेची साधने गमावून उपेक्षित व शोषित बनला. परिणामी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध शस्त्र उचलले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजाची भूमिका केवळ स्थानिक उठावांपुरती मर्यादित नव्हती; तर त्यांनी आर्थिक शोषणाविरुद्ध, सामाजिक अन्यायाविरुद्ध आणि राजकीय गुलामगिरीविरुद्ध मोठ्या प्रमाणात उठाव केले. भील बंड, संथाळ बंड, मुंडा चळवळ (बिरसा मुंडा), कोल बंड, रामोशी उठाव, खोंड उठाव यांसारख्या आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला हादरे दिले. हे उठाव केवळ स्वातंत्र्याच्या राजकीय मागण्यांसाठी नव्हते, तर ते आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे रक्षण, जमिनीवरील हक्क, आणि स्वायत्त जीवनशैलीचे संरक्षण यासाठीचे संघर्ष होते. याशिवाय १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातही आदिवासींनी शौर्यपूर्ण सहभाग नोंदविला. विसाव्या शतकात महात्मा गांधींच्या असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, भारत छोडो आंदोलनातही आदिवासी समाजाने योगदान दिले. तथापि, त्यांच्या योगदानाकडे इतिहासाच्या मुख्य प्रवाहाने अनेकदा दुर्लक्ष केले. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींच्या भूमिकेचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे ठरते. कारण त्यांचे योगदान केवळ इतिहासाच्या उपांत्य टप्प्यातील भाग नसून ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील मूलभूत व प्रेरणादायी अंग होते.
Files
S064016.pdf
Files
(698.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:a7ee26478eb41e6ebf51aa27ab05f05c
|
698.5 kB | Preview Download |