Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

भारतातील आदिवासी समुदाय : भूतकाळ, वर्तमान व भविष्य

Description

आपला भारत देश हा विविधतेतून एकता जपणारा वैभवशाली देश आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारत देशाची एक स्वतंत्र ओळख आहे. भारतात विविध धर्म, पंथ, वंश आणि संस्कृतीचे लोक राहतात. आज शेकडो वर्षानंतरही सर्व धर्म, पंथ, जाती समुदाय एकत्रित भारतात नांदताना दिसतात. एवढेच नाही तर विविध भाषा आणि बोलीभाषा बोलणारे लोक इथे आहेत. त्यामुळे भारतीय समाजात विविधता आढळते. विविधता हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे. भारतीय समाजात विविधता दिसत असली तरी भारतात वास्तव्य करणारी प्रत्येक व्यक्ती ही भारतीयच आहे. आपला भारतीय समाज अनेक प्रकारच्या जातीमध्ये विभाजित झालेला असून भारत देशात सहा हजारापेक्षा जास्त जाती आणि उपजाती आहेत. भारतातील प्रमुख आदिवासी समुदायात गोंड, भिल्ल, मीना, मुंडा, संथाल आणि कोरकू इत्यादी समुदायाचा समावेश आढळतो. हे आदिवासी समुदाय देशाच्या वेगवेगळ्या राज्यात आढळतात. ‘गों'ड’ हा आदिवासी समुदाय भारतातील सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे. तो प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्रात आढळतो. हे आदिवासी समुदाय आपल्या परंपरा आणि संस्कृतीमुळे सर्वपरिचित आहेत. ‘भिल्ल’ हा आदिवासी समुदाय भारतात राजस्थान गुजरात व मध्य प्रदेशात आढळतो. ‘मीना’ हा आदिवासी समुदाय राजस्थानमध्ये आढळतो. ‘संथाल’ हा आदिवासी समुदाय पूर्व भारत झारखंड पश्चिम बंगाल व उडीसा या राज्यात वास्तव्याला आढळतो. ‘कोरकू’ हा आदिवासी समुदाय मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या काही भागात आढळतो. ‘भुतिया’ हा आदिवासी समुदाय सिक्कीम, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात आढळतो. तसेच ‘चेंचू’ हा आदिवासी समुदाय आंध्रप्रदेश व तेलंगणा मध्ये आढळतो.  ‘बकरवाल’ हा आदिवासी समुदाय भारतातील जम्मू आणि काश्मीर या राज्यात आढळतो. त्याचबरोबर भारतात भिल्ल, वारली, कोळी, कातकरी, ओराव, कोकणा, कोलाम, ढोर कोळी, टोकरेकोळी, ठाकर, परधान, पावरा, मल्हार ,मुन्नेर, वारू, महादेव कोळी, माडिया गोंड व हलबा इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात. या आदिवासी जमाती उडीसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान आणि ईशान्य कडील काही राज्य इत्यादी प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. आदिवासी समाजात परंपरेला सर्वाधिक महत्त्व दिसते. तसेच त्यांच्यामध्ये एकजिनसीपणा व सामाजिक नियंत्रण जास्त आढळते.

Files

S064015.pdf

Files (702.6 kB)

Name Size Download all
md5:c16cf69724dd6a19b2df8ac69222bccd
702.6 kB Preview Download