भारतीय समाज सुधारणेतील आदिवासी चळवळींचे योगदान
Authors/Creators
- 1. जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको, नविन नांदेड
Description
भारतातील सामाजिक सुधारणांच्या प्रवाहात आदिवासी चळवळींना वेगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. आदिवासी समाज हा प्राचीन काळापासून स्वतंत्र संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीने नांदत आला आहे. मात्र वसाहतवाद, जमिनींची लुटमार, जंगल कायदे, शोषण आणि भेदभाव यांच्या अनुभवातून आदिवासी समाजात असंतोष आणि जागृती निर्माण झाली. हाच असंतोष विविध चळवळींच्या रूपाने प्रकट होवून केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक परिवर्तनालाही चालना मिळाली. प्रस्तूत संशोधनामध्ये विविध आदिवासी चळवळींचे आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक स्थितीत झालेल्या परिवर्तनाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातील वेगवेगळ्या आदिवासी चळवळींचा आढावा घेण्यात आलेला आहे. उपरोक्त चळवळींच्या आढाव्यातून असे स्पष्ट होते की, आदिवासी चळवळी या फक्त राजकीय बंड नव्हत्या, तर त्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक सुधारणांच्या अग्रस्थानी होत्या. या चळवळींच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये आत्मसन्मान, शिक्षण, संघटन आणि समानतेची भावना रुजवली. त्यामुळे भारतीय समाजाच्या व्यापक समाज सुधारणा प्रक्रियेत आदिवासी चळवळींचे महत्व अनन्यसाधारण आहे.
Files
S064004.pdf
Files
(722.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:6097513d0b7d3aa3ed793a2b45a1d41d
|
722.5 kB | Preview Download |