पुणे जिल्ह्यातील कृषी कर्ज पुरवठ्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका अभ्यासणे
Authors/Creators
- 1. अर्थशास्त्र विभाग प्रमुख, सुभाष बाबुराव कुल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केडगाव ता.- दौंड, जि.- पुणे
Contributors
Editor:
Description
संशोधनाचा मुख्य उद्देश पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) व प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांची कृषी कर्ज पुरवठ्यातील भूमिका, कार्यक्षमता व परिणामकारकता तपासणे हा आहे. या अभ्यासात 100 शेतकरी, 15 बँक शाखांचे कर्मचारी व 15 PACS व्यवस्थापकांचा डेटा संकलित करण्यात आला. नमुनेदार आकडेवारीच्या आधारे असे आढळले की PACS मार्फत मिळणारे कर्ज शेतकऱ्यांना तुलनेने अधिक सोपे व जलद उपलब्ध होते. PDCC शाखांमध्ये डिजिटल व्यवहारांची टक्केवारी अधिक असून प्रक्रिया वेळ PACS पेक्षा कमी आहे. आर्थिक साक्षरता प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांची परतफेड शिस्त अधिक आहे. पीकविमा व अनुदान जोडलेल्या खात्यांमध्ये NPA (थकीत कर्ज) प्रमाण लक्षणीयरीत्या कमी दिसून आले. या निष्कर्षांवर आधारित धोरणात्मक शिफारसी मांडण्यात आल्या आहेत.