Published October 31, 2025 | Version v1

ग्रामीण विकासात कृषी व कृषीपूरक व्यवसायाचे महत्व

  • 1. प्रिन्सिपल अरुणराव कलोडे महाविद्यालय नागपूर
  • 2. अर्थशास्त्र विभाग प्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय भिसी त.चिमूर जि.चंद्रपूर

Contributors

Description

          ग्रामीण विकास हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण पाया मानला जातो.भारतासारख्या कृषी प्रधान व उद्योग प्रधान देशामध्ये ग्रामीण क्षेत्रातील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार कृषी व कृषी पूरक व्यवसाय हे आहेत.मात्र हे दोन्ही घटक ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या उत्पन्न,रोजगार,अन्न सुरक्षा आणि औद्योगिक विकासात महत्वपूर्ण कार्य करीत आहेत.भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुमारे ६५ ते ७० टक्के लोक ग्रामीण भागात वास्तव्य करीत आहेत.आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मुख्यत्वे करून कृषी व कृषी पूरक व्यवसायाशी सबंधित असणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहेत.भारतातील ग्रामीण क्षेत्राशी संबंधित असणारा कृषी हा व्यवसाय केवळ अन्नधान्य उत्पादनाचे साधन नाहीत.तर रोजगार,उद्योग विकास, अन्नसुरक्षा आणि सामाजिक स्थैर्याचे मुख्य साधन आहेत.अलीकडील काळात शेतीवर आधारित असणारे पूरक व्यवसाय उदा.दुग्ध व्यवसाय,कुक्कुटपालन,फळप्रक्रिया,सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटन यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला नवीन आर्थिक आयाम मिळवून दिले आहेत.

Files

x171027...pdf

Files (853.6 kB)

Name Size Download all
md5:d0076095a799e531c67d1d16d0f52bce
853.6 kB Preview Download