Published September 30, 2025 | Version v1

कोविड विधवा महिलांच्या समस्या - एक अभ्यास

  • 1. संशोधन मार्गदर्शक, महात्मा गांधी मिशन विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर
  • 2. संशोधन संशोधक, महात्मा गांधी मिशन विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर

Contributors

Description

जागतिक संकट ठरलेल्या कोविड महामारी ने समाजातील प्रत्येक घटकावर प्रतिकूल परिणाम केले. हे परिणाम दीर्घकालीन ठरले या महामारीच्या संकटामुळे समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्तीची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पूर्णतः ढवळून निघाली. या महामारीचे सर्वाधिक परिणाम महिला आणि बालकावर झाले. covid महामारीच्या काळात विधवा झालेल्या महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक आणि प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले. विधवा महिलांना सुरक्षितपणे जगण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना आणि आव्हानांना सामोरे जावे लागले याचा प्रत्यय कोविड महामारीच्या काळात पुन्हा एकदा आला. अनेक महिला अकाली विधवा झाल्या काहींच्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा कोविड मृत्यू झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रस्तुत अभ्यासाच्या माध्यमातून कोविड काळात विधवा झालेल्या महिलांच्या आर्थिक सामाजिक समस्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Files

x170914.pdf

Files (584.7 kB)

Name Size
md5:59958455b77b5d8734c4897ae125fd04
584.7 kB Preview Download