Published September 30, 2025 | Version v1

कृषी व कृषी पूरक व्यवसायाचे आर्थिक अध्ययन

  • 1. प्रिन्सिपल अरुणराव कलोडे महाविद्यालय नागपूर
  • 2. अर्थशास्त्र विभाग प्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय,भिसी त.चिमूर जि.चंद्रपूर

Contributors

Description

कृषी व्यवसाय हा जगातील अनेक व्यवसायापैकी सर्वात जुना व्यवसाय आहे.कारण मानवाच्या मुलभूत गरजा अन्न,वस्त्र ,निवारा असून मनुष्य वसाहती करून राहत असल्यामुळे तो शेतीकडे विशेष लक्ष देऊ लागला.औद्योगीकीकरणाचा विस्तार आणि विकास आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात होत असला तरी मात्र आजही कृषी व्यवसाय हा जगातील एक मोठा व्यवसाय म्हणून समजला जातो.कारण जगाच्या एकूण लोकसंखेपैकी १ /३ लोकांचा उदरनिर्वाह हा कृषी व्यवसायावर अवलंबून आहे.शिवाय संपूर्ण जगातील लोकांना अन्नधान्याचा पुरवठा कृषी क्षेत्राच्या माधमातून होतो.त्यापैकी जगातील एकूण उत्पादन होणाऱ्या अन्नात २३ टक्के वाटा हा मासे व मासं यांचा आहे.जगातील लोकसंख्या दरवर्षी वाढत असली तरी मात्र शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांचा योग्य प्रमाणात वापर करून पुरेसा कृषी कृषी विकास घडवून आणण्यासाठी सर्वच राष्ट्रांचे फार महत्व आहे.जगाच्या उपासमारी,कुपोषण व दारिद्य्र या सारख्या समस्या सोडविण्यासाठी कृषी क्षेत्राची महत्वपूर्ण गरज आहे.तर काही देशांमध्ये लोकांचे कृषी जीवन अशा परिस्थितीत आहे.कारण त्यांचा उदरनिर्वाह हा कृषीवरच अवलंबून आहे. आपल्या अन्न,वस्त्र व निवारा इत्यादी गरजा भागविण्यासाठी लागणारे पदार्थ वनस्पती व प्राणी यांच्या पासून मिळतात.म्हणूनच पिकांबरोबरच गुरे ,कोंबड्या,बकऱ्या,मेंढ्या व मधमाशा पाळणे , रेशमाचे किडे पोसणे ,बागायती करून फळफळावळ काढणे,इत्यादी उद्योगाचीही कृषी पूरक व्यवसायात समावेश होतो.

Files

x170954.pdf

Files (817.8 kB)

Name Size Download all
md5:5aef03130b346d98939042c6ce32c194
817.8 kB Preview Download