राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक योगदान
Authors/Creators
- 1. संशोधक विद्यार्थी, पी. जी. डी. टी. मराठी रा. तु. म. नागपुर विद्यापीठ
- 2. प्राध्यापक व मराठी प्रमुख विद्यासागर कला महाविद्यालय, खैरी(बिजेवाडा), रामटेक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे सामाजिक योगदान
Contributors
Editor:
Description
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती तालुक्यातील यावली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव मंजुळा व वडिलांचे नाव बंडूजी घरी १८ विश्वे दारिद्र्य महाराजांचे जन्माची वेळी एवढं वादळ झालं की घरावरचे छप्पर देखील उडून गेले महाराजांचे जन्मनाव माणिक. महाराजांचा जन्म वरखेडवासी विदेही संत अडकुजी महाराज यांच्या कृपाप्रसादाने झाला म्हणून आई-वडिलांनी त्यांना त्यांच्या पायावर घातले त्यांच्याबरोबरच बाल मणिक पुढे तुकडे खाऊ लागला आणि पुढे माणिकचा तुकड्या झाला.
बालपणी महाराज द्वाड होते शाळेपेक्षा त्यांचा ओढा शिवालयाकडे होता अभ्यासाऐवजी एकतारी व खंजिरीवर भजने म्हणण्यात त्यांचा वेळ जाई. त्यासाठी त्यांना वडिलांकडून प्रसाद मिळे एवढेच नव्हे तर कधी कधी त्यांच्या द्वाडपणाची शिक्षा त्यांचे आईसही मिळे’ मग मात्र त्यांच्या मनात कालवा कालव होई बापाचा धंदा शिंप्याचा होता मग ते मुकाटपणे काही दिवस बापाला मदत करू लागले’ परंतु वैराग्य भावना व ईश्वर दर्शनाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना यातच 1921 साली त्यांचे गुरु आडकोजी महाराज समाधीस्थ झाल्यामुळे त्यांच्यावर फार मोठा आघात झाला ते पुढे पंढरीस गेले. घरी परत आले खरे परंतु मन रमेना म्हणून 1923 साली त्यांनी रामटेक च्या जंगलाचा रस्ता धरला व पुढे फिरत फिरत चिमूरकडील जंगलात गेले तिथे ते देवबाबा या नावाने ओळखले जाऊ लागले.
इसवी सन 1925 मधे त्यांना विदर्भात आणण्यात आले. त्यांनी मग देशभर दौरा केला. समाजाच जवळून निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी सालबर्डी व मोझरी येथे यज्ञे घडून आणले. सत्याग्रह शिबिरातून भजनी म्हटली. 1936 मध्ये त्यांना महात्मा गांधी यांनी आपल्या आश्रमात महिनाभर ठेवून घेतले. त्यांनी आरती मंडळाची स्थापना केली. पुढे सेवा मंडळात त्याचे परिवर्तन झाले. सेवा मंडळाद्वारे त्यांनी गावोगावी प्रार्थना ,व्यायाम, शिबिरे, चरखा, मंडळ महिलोन्नती यासारखे प्रभावी कार्य केले.
Files
x170939.pdf
Files
(663.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:edd28cfbeddab1a21d1604ee52c47c7c
|
663.9 kB | Preview Download |