Published September 30, 2025 | Version v1

मराठी साहित्यातील आत्मकथनांमागील प्रेरणा

  • 1. संशोधक विद्यार्थिनी, नागपूर विद्यापीठ ,नागपूर
  • 2. प्राध्यापक मार्गदर्शक, मराठी विभाग प्रमुख, एस .एस.गर्ल्स कॉलेज,गोंदिया

Contributors

Description

           लेखात आत्मकथनाच्या प्रेरणांच्या विविध पैलूंचा विचार करण्यात आला आहे—मानसिक, भावनिक, सामाजिक प्रकटीकरणाची प्रक्रिया; लिंग, कौटुंबिक बंधने व सामाजिक बंधनांतून निर्माण झालेल्या स्त्रीलेखनाच्या प्रेरणा; ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैचारिक प्रेरणा; तसेच अन्याय, विषमता, शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याची चेतना.दलित, स्त्रीवादी, आदिवासी आणि भटक्या समाजातील लेखकांनी आत्मकथनाच्या माध्यमातून स्वतःचे अनुभव, संघर्ष आणि समाजातील असमानता प्रामाणिकपणे मांडली आहे. त्यामुळे आत्मकथन हे केवळ वैयक्तिक न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भात एक दस्तऐवज बनते. मराठी आत्मकथनाची वाटचाल धार्मिक व सुधारक व्यक्तिमत्त्वांच्या आत्मलेखनापासून सुरू होऊन आधुनिक काळातील सामाजिक परिवर्तनापर्यंत विस्तारलेली दिसते. आत्मकथन हा केवळ साहित्यप्रकार नसून तो सामाजिक जाण, आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे.

 

Files

x170936.pdf

Files (591.7 kB)

Name Size Download all
md5:36200bc5090c40f26410fcea023e73b5
591.7 kB Preview Download