भाजीपाला मूल्यसाखळीत नासधूस व कोल्ड-चेनचा परिणाम अभ्यासने ( विशेष संदर्भ - नाशिक व अहमदनगर जिल्हे )
Authors/Creators
- 1. Associate Professor, ASC College Kolhar
Contributors
Editor:
Description
गोषवारा
भारतामध्ये फळे व भाजीपाला उत्पादन साखळीत पश्चात्त तोडणीतील नासधूस ही गंभीर समस्या असून ती शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर, बाजारभावांच्या स्थैर्यावर आणि अन्नसाखळीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील केस-स्टडीवर आधारित या संशोधनात पोस्ट-हार्वेस्ट नासधूस टक्केवारी, शेल्फ-लाईफमधील बदल, किंमत-प्रसारणाची रचना आणि कोल्ड-चेन सुविधांचा परिणाम तपासण्यात आला. सर्वेक्षणानुसार भाजीपाल्यांतील सरासरी नासधूस 10–12% असून टोमॅटोमध्ये ती सर्वाधिक आहे. कोल्ड-चेन सुविधांचा वापर केल्यास शेल्फ-लाईफ ५–७ दिवसांनी वाढून विक्री नियोजन लवचिक होते व नुकसान घटते. किंमत-प्रसारण विश्लेषणात शेतकऱ्यांचा हिस्सा 30–40% इतकाच असून शीतसाखळीचा अभाव असल्यास तो आणखी कमी होतो. नाशिक व अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांत शीतसाखळी क्षमतेत मोठी दरी असल्याने तातडी विक्री व किंमत-अस्थैर्य वाढते. अभ्यासातून स्पष्ट झाले की शीतसाखळी पायाभूत सुविधा, प्रीकूलिंग, पॅकहाऊस व FPO-आधारित बाजारजोडणी यांचे समन्वित मॉडेल राबविल्यास नासधूस घटवून शेतकऱ्यांचे उत्पन्न व मूल्यसाखळी कार्यक्षमता वाढवता येईल.
Files
46.pdf
Files
(646.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:2fb36b05ea2d04d1b2dcac59a39c6b6d
|
646.5 kB | Preview Download |