Published September 30, 2025 | Version v1

मानव विकास निर्देशांक- विशेष संदर्भ तुळजापूर तालुका

  • 1. सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नलदुर्ग

Description

सारांश-

मानव विकास निर्देशांक (HDI) हा आर्थिक विकासाच्या संकल्पनेपलीकडे जाऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक घटकांचा विचार करणारा एक महत्त्वपूर्ण सूचक आहे. या संशोधन लेखात तुळजापूर तालुक्यातील मानव विकासाची स्थिती तपासण्यात आली आहे. संशोधनासाठी साध्या यादृच्छिक नमुना पद्धतीने 24 कुटुंबांची निवड करून त्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. निष्कर्षानुसार, तुळजापूर तालुक्याचा मानव विकास निर्देशांक 0.424 आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तालुक्यातील सरासरी आयुर्मान 70.23 वर्षे असून स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात. साक्षरतेचे प्रमाण 44.19% इतके कमी असून निरक्षरतेचे प्रमाण 55.81% आहे. प्रौढ साक्षरता दर 56.84% आणि विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण 43.16% आढळले. दरडोई वार्षिक उत्पन्न केवळ 9274 असून ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. या परिस्थितीमुळे तुळजापूर तालुक्यात शिक्षण, आरोग्य व आर्थिक स्वावलंबन यामध्ये मागासलेपण दिसून येते. या समस्यांच्या निराकरणासाठी शैक्षणिक सुविधा वाढवणे, पायाभूत सुविधा उभारणे, कर्जसहाय्य उपलब्ध करून देणे आणि आरोग्यसेवा सुधारण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Files

44.pdf

Files (1.2 MB)

Name Size Download all
md5:ab1fd6cb9ca0fbcebed09c7fa5a87720
1.2 MB Preview Download