Published September 30, 2025 | Version v1

भारतातील डाळिंब उत्पादन व निर्यात प्रवृत्ती

  • 1. संशोधक विद्यार्थी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

Contributors

Description

गोषवारा-

जागतिक स्तरावर डाळिंब उत्पादन आणि निर्यातीत भारत अग्रणी देश आहे. भारताचे वार्षिक डाळिंब उत्पादन सुमारे ७,५०,००० टन असून त्याचा जागतिक उत्पादनातील वाटा ४१.८७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही भारतातील प्रमुख डाळिंब उत्पादक व निर्यात करणारी राज्ये आहेत. ‘भगवा’, ‘गणेश’, ‘अरक्ता’ आणि ‘मृदुला’ या जातींची निर्यातक्षमता अधिक असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना विशेष मागणी आहे. भारतातून प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, बांग्लादेश, नेदरलँड, सौदी अरेबिया आणि नेपाळ या देशांना डाळिंब निर्यात केली जाते. २०११-१२ मध्ये २,२३८ टन एवढी असलेली डाळिंब निर्यात २०२०-२१ मध्ये ३५,३११ टनांपर्यंत वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ झाली असून परकीय चलन मिळविण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. तथापि, भारतातील प्रती हेक्टर उत्पादकता इतर काही देशांच्या तुलनेत कमी असल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. या अभ्यासाद्वारे भारतातील डाळिंब उत्पादन, निर्यात प्रवृत्ती, निर्यातक्षम जाती, गुणवत्तेचे निकष आणि निर्यात बाजारपेठांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

Files

40.pdf

Files (792.3 kB)

Name Size Download all
md5:57aabdbb92b8ce9827cda622c6c87d51
792.3 kB Preview Download