Published September 30, 2025 | Version v1

कृषी क्षेत्रातील उत्पादन, उत्पादकता आणि व्यापार रचनेचे विश्लेषण

  • 1. प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड, ता. कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर

Contributors

Description

गोषवारा

भारत हा कृषिप्रधान देश असून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. 1950-51 ते 2023-24 या कालावधीतील डाळवर्गीय, तेलबिया, कापूस, अन्नधान्य व ऊस या पिकांच्या उत्पादन, उत्पादकता, लागवड क्षेत्र व सिंचनाखालील क्षेत्र यांचे विश्लेषण करण्यात आले. तसेच 2015-16 व 2022-23 या दोन वर्षांतील कृषी क्षेत्रातील आयात-निर्यात व्यापार रचनेचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात असे दिसून आले की कृषी क्षेत्रातील निर्यात व आयातीचे प्रमाण राष्ट्रीय निर्यात-आयातीच्या तुलनेत घटले आहे. आयातीत सर्वाधिक वाटा खाद्यतेलाचा असून त्याचे प्रमाण वाढले आहे, तर डाळींच्या आयातीमध्ये घट झाली आहे. निर्यातीत सर्वाधिक वाटा सागरी उत्पादनांचा आहे, त्यानंतर तांदूळ, साखर, मसाले व कापूस या घटकांचा सहभाग आहे. महाराष्ट्र राज्य कापूस व डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात आघाडीवर असूनही उत्पादकतेत इतर राज्यांच्या तुलनेत मागे आहे. या अभ्यासातून असे दिसते की उत्पादकता वाढविण्यासाठी शाश्वत शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पिकांचे वैविध्य आवश्यक आहे. तसेच कृषी निर्यात वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जानुसार उत्पादन आणि परकीय चलन उत्पन्नावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

Files

34.pdf

Files (624.2 kB)

Name Size Download all
md5:51209a226500b80d957fac08c681f6c1
624.2 kB Preview Download