ग्रंथालयांमधील सोशल मीडियाची भूमिका
Authors/Creators
- 1. श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, सांगली
Description
माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे आज ज्ञानवितरणाच्या पारंपरिक पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी, जलद व सर्वसमावेशक साधन म्हणून उदयास आले आहे. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर (X), व्हॉट्सअॅप, लिंक्डइन यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी माहितीचे आदानप्रदान, वाचकांसोबतचे संवाद, सेवांचे प्रसार व ग्रंथालयीन उपक्रमांचे जनजागरण या सर्व बाबींमध्ये नवे आयाम उपलब्ध करून दिले आहेत. पारंपरिक पुस्तककेंद्रित ग्रंथालये आता केवळ संग्रह व संदर्भसेवा पुरवणारी केंद्रे न राहता, डिजिटल संवाद केंद्रे, समाजाभिमुख माहिती स्रोत व शैक्षणिक क्रियाकलापांचे सक्रिय व्यासपीठ म्हणून विकसित होत आहेत.
या संशोधन लेखामध्ये सोशल मीडियाचा ग्रंथालय सेवांमध्ये समावेश, त्याद्वारे साध्य होणारे फायदे, उद्भवणाऱ्या मर्यादा व अडचणी यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी संशोधन लेख, ग्रंथालयीन वार्षिक अहवाल, ऑनलाईन उपलब्ध माहिती, मार्गदर्शक तत्त्वे आणि विविध दुय्यम माहिती स्त्रोतांचा आधार घेण्यात आला आहे. विश्लेषणातून असे स्पष्ट होते की, सोशल मीडिया हे ग्रंथालय व वापरकर्ते यांच्यातील संवाद अधिक सशक्त करणारे, माहितीच्या प्रसाराची गती वाढवणारे तसेच नव्या पिढीच्या वाचकांना आकर्षित करणारे साधन ठरले आहे.
निष्कर्षत, सोशल मीडिया हे आधुनिक ग्रंथालय व्यवस्थापनातील एक घटक असून, डिजिटल युगातील वापरकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व ग्रंथालयीन सेवांना अधिक परिणामकारक बनवण्यासाठी ते उपयोगी ठरणार आहे. भविष्यातील ग्रंथालय संकल्पना ही केवळ ज्ञानसंग्रहापुरती मर्यादित न राहता, सामाजिक संवाद, शैक्षणिक सहकार्य आणि ज्ञानवितरणाचे बहुआयामी केंद्र म्हणून विकसित होईल, याचे द्योतक म्हणजे ग्रंथालयांमधील सोशल मीडियाची भूमिका होय.
Files
S063977.pdf
Files
(625.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:83f9141ba99be8f68d86ff380e09dab2
|
625.9 kB | Preview Download |