Published August 30, 2025 | Version v1
Journal article Open

भारतातील शाश्वत विकासासाठीच्या योजना : एक अभ्यास

  • 1. सहयोगी प्राध्यापक , लोकप्रशासन विभाग प्रमुख, गोदावरी कला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय अंबड, जिल्हा जालना

Contributors

Description

सारांश

      या संशोधनप्रबंधात भारतातील शाश्वत विकासासाठीच्या योजना यांचा अभ्यास करण्यात आला आहे. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी त्यांचा टिकाऊ वापर हा शाश्वत विकासाचा मुख्य गाभा असल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 मध्ये निश्चित केलेली 17 शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी भारत विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. प्रमुख योजनांमध्ये स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाव बेटी पढाओ, प्रधानमंत्री जन-धन योजना, स्मार्ट सिटी, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, स्टार्टअप योजना, एकात्मिक बाल विकास योजना, नमामि गंगे, राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना, हरित भारत अभियान, मनरेगा इत्यादींचा समावेश आहे. या योजनांचा उद्देश गरिबी निर्मूलन, आरोग्य व शिक्षण सुधारणा, लैंगिक समानता, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांत प्रगती साधणे हा आहे. अहवालानुसार, भारताने काही क्षेत्रांत प्रगती केली आहे, विशेषतः स्वच्छ ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात, परंतु बालमृत्यू आणि लैंगिक समानता यांसारख्या क्षेत्रांत सुधारणा आवश्यक आहे. 2025 च्या संयुक्त राष्ट्र अहवालात भारताचा क्रमांक 99 होता, जो शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या बाबतीत अजूनही आव्हानात्मक स्थिती दर्शवतो.

 

Files

33.pdf

Files (547.5 kB)

Name Size Download all
md5:70625add9d2b8209fc300e4b31c33569
547.5 kB Preview Download