Published August 30, 2025 | Version v1

गुजर समाज व संस्कृती

  • 1. संशोधक विद्यार्थी , म.गां.विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्याल, मनमाड
  • 2. पीएच्.डी. संशोधन मार्गदर्शक, मराठी विभाग, म.गां.विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, येवला

Contributors

Researcher:

Description

सारांश

        सदर शोधनिबंधात उत्तर महाराष्ट्रातील गुजर समाज व संस्कृतीचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिण पायथ्याशी व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला हा समाज गुजर बोली (गुजरी) भाषेसाठी ओळखला जातो. ऐतिहासिक नोंदींमधून गुर्जर प्रतिहार वंश, लेवा व दोडे गुजर अशा उपशाखांचा उगम, स्थलांतराची प्रक्रिया व त्यांचे वसतिस्थान स्पष्ट केले आहे. पारंपरिक शेती व पशुपालन हा समाजाचा मुख्य व्यवसाय असून धार्मिक जीवनात शिवपार्वती, रामसीता, राधा-कृष्ण, गणेश, सरस्वती पूजन व कुलदैवतांची उपासना यांना महत्त्व आहे. सामाजिक जीवनात संयुक्त कुटुंब पद्धती, सण-उत्सव, लोकगीते, रितीरिवाज व सामूहिक सहजीवन यांचा प्रभाव दिसून येतो. बोलीभाषा, लोकसाहित्य व संस्कृतीचे जतन हे आजच्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे आव्हान असून त्याचे दस्तावेजीकरण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

 

Files

28.pdf

Files (676.2 kB)

Name Size
md5:0514360cf26585e9586e145bdf951149
676.2 kB Preview Download