राजकारणाचे गुन्हेगारीकरण
Description
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकीयीकरण हा अलीकडील काळात ट्रेंड बनून गेला आहे. राजकारणातील गुन्हेगारी हा नेहमीच चर्चेचा व चिंतेचा विषय ठरत आला आहे. निवडणुकीवेळी उमेदवारी देतांना अनेक उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असते. हे उमेदवार लोकशाहीचे न जुमानता निवडणुकीत निवडून देखील येतात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे अनेक लोक गैरमार्गाने, गुंडागर्दी करून, धाक दाखवून पैसा गोळा करतात आणि त्याच पैशांच्या जोरावर पुढे राजकारणात येतात. राजकारणात आल्यावरही यांची गुंडागर्दी सुरूच राहते. पैसा कमावणे आणि त्याच्या जोरावर पुन्हा गुंडागर्दी करणे, हा यांचा जणू व्यवसाय झाला आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. उमेदवाराची निवड निश्चित झाल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांच्या गुन्हेगारी नोंदींवरील मार्गदर्शक तत्त्वे आणखी कठोर केली आहेत आणि पूर्वीच्या निकालात सुधारणा केली आहे.