Published February 28, 2025
| Version v1
Journal article
Open
शारीरिक शिक्षण व योगाचे वाढते महत्व
Authors/Creators
- 1. संशोधक विदयार्थी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
- 2. संशोधक मार्गदर्शक, डी. डी. एन. भोळे महाविद्यालय, भुसावळ
Contributors
Editor:
Description
गोषवारा :-
‘ निरोगी शरीरात निरोगी मन ’ या म्हणी प्रमाणे जे शरिर निरोगी असते त्या शरीरात मन देखील निरोगी असते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला शरीर संवर्धन करण्यासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. मनुष्य पैसे कमविण्यासाठी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करीत असतो. पण कोरोना महामारीने दाखवून दिले कि, तुमच्या कडे कितीहि संपत्ती असुद्या, कितीही सत्ता असुद्या त्याचा काही उपयोग होत नाही. तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ सुधृढ असेल तर आपण कोरोना सारख्या महामारीपासून देखील वाचू शकतो. यासाठी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्याची गरज आहे. हा लेख लिहिण्यामागचा उद्देश असा आहे कि, शारीरिक शिक्षण व योग शिक्षणाचे महत्व वाढतांना आपणास दिसून येत आहे.