Published January 30, 2025 | Version v1

स्वामी दयानंद सरस्वती व आर्यसमाज

  • 1. , खोलेश्वर महाविदयालय अंबाजोगाई

Description

         भारतातील महान पंडित,प्रभावी वक्ते व धर्मसुधारक म्हणून आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडे पाहिले जाते.आधुनिक भारताच्या इतिहासात एक द्वितीय स्थान व्यापलेले आहे .त्यांनी भारतीय समाजाला पुन्हा वेदांकडे वळवण्याचे कार्य केले. त्यांचे जीवन सत्याच्या शोधात समर्पित होते, आणि त्यांनी अंधश्रद्धा, मूर्तिपूजा, जातिभेद, आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली.जेव्हा भारतातील सुशिक्षित तरुण युरोपियन सभ्यतेच्या वरवरच्या पैलूंची गुलामगिरी करत होते तेव्हा स्वामी दयानंदानी धैर्याने भारताच्या आव्हाना तोंड दिले.पश्चिमेकडील सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय वर्चस्वाच्या विरोधात कार्य केले .स्वामी दयानंद सरस्वती यांच्या "सत्यार्थ प्रकाश" या ग्रंथाने धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठी नवा विचार दिला.स्वामी दयानंद सरस्वती यांचे योगदान आधुनिक भारताच्या घडणीसाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी "वेद हीच ज्ञानाची खरी शिदोरी" असे प्रतिपादन केले आणि "वेदों की ओर लौटो" हा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी आणि आर्य समाजाच्या कार्याने भारतीय समाजात शिक्षण आणि जागृतीचे नवे युग सुरू केले

Files

S060744.pdf

Files (442.8 kB)

Name Size
md5:1b1540f2c812be395fa7c1e5967814c6
442.8 kB Preview Download