Published January 30, 2025
| Version v1
Journal article
Open
स्वामी दयानंद सरस्वती यांचे राजकीय विचार
Authors/Creators
Description
स्वामी दयानंद सरस्वती यांचा कालखंड असा होता की ज्या कालखंडात ब्रिटिशांचे भारतात चांगल्या प्रकारे आगमन झाले होते.त्यांच्या आगमनानंतर पाश्चाते तत्त्वज्ञान आणि त्यांच्या भौतिक प्रगतीने भारतातील तरुण पिढी प्रभावीत झाली होती. ब्रिटिशांनी भारतात सुरू केलेल्या ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे भारतीय तरुण इंग्रजी भाषा शिकून स्वतःचे आणि भारतीय समाजाचे परीक्षण करून लागला. त्याचा दुरगामी परिणाम असा झाला की त्यातून एक नवविचाराची लाट निर्माण झाली आणि या लाटीतून 19 व्या शतकात सामाजिक आणि राजकीय चळवळ सुरू झाल्या. या चळवळीच्या माध्यमातून जे नेतृत्व भारतात पुढे आले त्यापैकी स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.