पश्चिम विदर्भातील बंजारा समाजाच्या शैक्षणिक संस्थेचे विस्तार आणि विकासातील योगदान
Description
पश्चिम विदर्भ भारताच्या हृदयस्थानी व महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला सातपुडा पर्वताच्या कुशीतील दख्खनच्या पठारावर वसलेला अमरावती प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जातो. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यामध्ये बहुजन लोकसमुदाय वास्तव्याला असुन ग्रामीण भागापेक्षा शहरातील लोकसंख्या आणि साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. स्वातंत्र्योत्तर कालीन पश्चिम विदर्भामध्ये सामाजिक चळवळीच्या जडणघडणीला व शैक्षणिक विकासाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. एकोणविसाव्या शतकापर्यंत अशिक्षित असलेला बंजारा समाजाला विसाव्या शतकाच्या प्रारंभी आधुनिक काळातील जागतीकीकरणाशी निकटचा संबंध आल्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे वाघीणीचे दुध असल्याचे समजले.