Published May 30, 2024 | Version v1
Journal article Open

राजर्षी शाहू महाराज यांचे कोल्हापूर संस्थानातील शैक्षणिक कार्य

Authors/Creators

  • 1. सहाय्यक प्राध्यापक, पदवी, पदव्युत्तर व संशोधन केंद्र, इतिहास विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड

Description

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रथम लोकनेते म्हणून पुढे आले, नंतर ते छत्रपती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये अजरामर झाले. शाहू महाराज हे प्रथम छत्रपती म्हणून लोकांसमोर आले आणि त्या मागोमाग ते लोकनेते म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर झाले. सामान्य जनतेच्या जीवनाशी  त्यांनी  स्वतःच्या उद्धारासाठी चालविलेल्या झगड्यांशी  समरस होऊन त्यांच्यामध्ये वावरणारा राजा त्यांच्या वेळेच्या संस्थानिकात त्यांच्यासारखा दुसरा कोणी झालाच नाही.

इतिहासाला देणं देण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खुलून दिसते. सामान्य जनतेची दुःखे, भावना, ओळखून त्यांच्या दुःखाचे निवारण करण्याचे काम आपल्या आयुष्यभर सर्वस्व पणास लावून केले.

आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाला ज्यांचे कर्तुत्व प्रामुख्याने कारणीभूत ठरले अशा थोर पुरुषांच्या मालिकेत राजर्षी शाहू महाराज यांची गणना केली जाते. 19 व्या शतकातील ऐषोरामी  प्रतिगामी आणि लहर बहाद्दर राजेरजवाड्यांच्या काळात शाहू महाराजांसारखा बहुजन समाज प्रेमी, कुशल प्रशासक, सामान्य जनतेची दुःख ओळखणारा, शिक्षण प्रेमी, कर्ता सुधारक क्वचितच अवतरतो.

Files

x58.pdf

Files (481.4 kB)

Name Size Download all
md5:e1f5effe2827f147b157c15bfc83dbc7
481.4 kB Preview Download