Published May 30, 2024 | Version v1
Journal article Open

मानव मुक्तीचा जागर आणि महाड चवदार तळ्याचे सत्याग्रह

Authors/Creators

  • 1. सहयोगी प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बदनापूर, जिल्हा- जालना

Description

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये जे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहेत त्या कार्यामध्ये एक महत्त्वाचे कार्य म्हणून जे ओळखले जाते ते म्हणजेच महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहचा उल्लेख केला जातो. या सत्याग्रहाबाबत माहिती सांगत असताना यामध्ये त्यांनी जे समुदायाकरिता काम करीत होते तो समुदाय अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगत होता. या समुदायाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यात आपल्या जीवनामध्ये स्वतःला कसे महत्त्व द्यावे तसेच हा जो समुदाय आहे हा समुदाय हजारो वर्षापासून मानवी मूल्यापासून कसा कोसो दूर होता. त्या समुदायास मानवी हक्क प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाला एक  मानवतेची भूमिका कशी पार पाडावी याची जाणीव त्यांच्या संघर्षमय जीवनातून दिसून येते.म्हणूनच जीवनाची व्यथा त्यांच्या या महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहात दिसते. त्यामुळे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आज भारतीय समाजामध्ये एक अस्पृश्य समाज म्हणून ओळखला जात होता या अस्पृश्य समाजाला मानवतेची तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची कशी आवश्यकता आहे याची ती या महाड चवदार तळ्याच्या आंदोलनातून जाणीव करून देतात. म्हणून त्यांचा हा आंदोलनाचा जो मार्ग होता हा मार्ग कशा पद्धतीने स्वीकारला या मार्गातून जनतेला ते कशाप्रकारे मानवी अधिकार प्राप्त करून दिले याची आजच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या विचार कार्याची कशी प्रासंगिकता  आहे याबाबत विचार करणे गरजेचे आहे.

Files

x44.pdf

Files (510.5 kB)

Name Size Download all
md5:068cc329e50e19879bdd3f840636e0ef
510.5 kB Preview Download