सेवाग्राम :- एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप
Authors/Creators
Contributors
Researcher:
- 1. इतिहास विभाग प्रमुख राणी लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय सावरगावत.नरखेड जि. नागपूर
Description
आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील पूर्वीचे सेगाव व आधुनिक नाव सेवाग्राम असलेल्या गावाला ऐतिहासिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण स्थान व महत्त्व प्राप्त झालेले आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाचा फार मोठा काळ सेवाग्राम येथे वास्तव्य करून घालविला आहे. इ.स.1935 च्या भारत सरकार अधिनियमावर बहिष्कार घालण्याचा काँग्रेसचा निर्णय सेवाग्रामलाच झाला. प्रांतिक स्वायत्तता तत्त्वानुसार घेण्यात येणाऱ्या निवडणुकीतील काँग्रेसचा महत्त्वाचा निवडणूक जाहीरनामाही सेवाग्राम येथूनच घोषित करण्यात आला. काँग्रेस बहुमतात असलेल्या प्रांतामध्ये सरकारने गांधीजींना दिलेल्या हमीनंतर काँग्रेसने अधिकार ग्रहण करण्याचा निर्णय सेवाग्रामलाच घेतला. दुसऱ्या जागतिक महायुद्धात भारतीयांचा आणि काँग्रेसचा कौल न घेता भारताला महायुद्धाच्या खाईत ब्रिटिशांनी लोटले. त्याचा निषेध सेवाग्राममधूनच करण्यात आला. केवळ शाब्दिक निषेधावरच न थांबता काँग्रेस प्रांतामधील लोकनियुक्त सरकारांना सत्तात्याग करण्याचा आदेशही सेवाग्राममधूनच देण्यात आला. गांधीजींनी 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहाची सिद्धता सेवाग्राममधूनच केली. सेवाग्रामच्या बाजूलाच असलेले पवनार आश्रमातील विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहातील देशाचे पहिले सत्याग्रही होते. भारतालाच नव्हे तर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला प्रभावी हादरा देणाऱ्या छोडो भारत अथवा चलेजाव आंदोलनाचा निर्णय सेवाग्राम मधूनच घेण्यात आला. छोडो भारत सत्याग्रहाची युद्धनीती सेवाग्राम मध्येच ठरविण्यात आली. वर्धा ठराव येथेच पारित करण्यात आला. त्याच आधारावर 7 व 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टॅंक मैदानावर भरलेले अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन व तेथून छोडो भारत चळवळीचे फुंकण्यात आलेले रणसिंग व देशभर झालेल्या हालचाली फार महत्त्वपूर्ण ठरल्या
Files
x9..pdf
Files
(474.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:29f992a8ae5a087de62a5a9038f3e37b
|
474.7 kB | Preview Download |