Published May 30, 2024 | Version v1
Journal article Open

पंचगव्हाण येथील मुगलकालीन शिलालेखांचा अभ्यास

Authors/Creators

  • 1. पत्ता - गोपाळ नगर, हनुमान मंदिरजवळ, खामगाव, जि. बुलडाणा. पिन 444303

Description

१५९६ ला चांदबिबीने वऱ्हाड प्रांत मोगलांना कायमस्वरूपी दिल्याने या प्रांतावरील अहमदनगरच्या निजामशाहीचा अंमल संपुष्टात आला व महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेतील मोगलांचे पहिले आगमन हे वऱ्हाडातच झाले. मोगलांनी आपले पहिले लष्करी ठाणे बाळापुरला व नंतर शहापूरला वसवले. शहापूर हे शहर वसवल्याचे व तेथे सुंदर राजमहाल बांधण्याचे श्रेय अकबरपुत्र मुरादला जाते. हे शहापूर आरंभीच्या काळात वऱ्हाडची मुगलांची राजधानी होती.1 मोगलांचा या प्रांतावरील वर्चस्वाचा कालखंड १५९६ ते साखरखेर्ड्याची लढाई १७२४ पर्यंत सांगता येईल. या कालखंडात अनेक महत्वाची लष्करी व्यापारी ठाणी उदयास आली. त्यापैकीच एक पंचगव्हाण (ता.तेल्हारा जि अकोला) हे एक महत्वाचे परगणा मुख्यालयाचे गाव होते. या गावची ओळख नेकनाम घराण्यामुळे निर्माण झाली. मुगल काळात त्यांच्या आगमनापासूनच हे घराणे मुगलांशी एकनिष्ठ होते व शेवटपर्यंत त्यांच्या लष्करी सेवेत ते राहिले. त्यांच्या घराण्याच्या अनेक सरदारांनी पिढी दर पिढी मुगल सैन्यात सेवा देवून वीरमरण पत्करलेले दिसून येते

Files

x8..pdf

Files (573.2 kB)

Name Size Download all
md5:63f3f31a8b22fb944a9c239279beb7e7
573.2 kB Preview Download