Published May 30, 2024 | Version v1
Journal article Open

सामाजिक पुनर्बांधणीत महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान

Authors/Creators

  • 1. श्री.संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर (चौ.)

Description

भारतीय प्रबोधन चळवळ आणि समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अग्रगण्य क्रांतीकारक, समाज चिंतक म्हणून महात्मा ज्योतीराव फुले यांचा उल्लेख प्रामुख्याने केल्या जातो आणि विशेषतः आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे. फुलेंनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय अशा अनेक विषयांवर परिवर्तनवादी, बंडखोर, बुद्धिवादी असे मार्मिक विचार मांडले. फुल्यांनी मांडलेले विचार तत्कालिन परिस्थितीत परिवर्तन घडविण्यासाठी तर उपयुक्त होतेच परंतु त्याच्या विचारातील मूलभूत सूत्र मात्र काळाला भेदून पुढे जाणारे आहेत. १९ व्या शतकात भारतात धार्मिक पुनरूज्जीवनावर आधारलेला राष्ट्रवाद उदयास येत होता तर दुसऱ्या बाजूने उच्चभु आंग्लविद्याविभूषीत नवतरूण सुशिक्षीतांमध्ये तर्ककर्कश शुद्ध बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रभाव होता. महात्मा फुलेंची नाळ मात्र सर्वसामान्य बहुजन वर्गाशी जुळलेली होती. म्हणून त्यानी या दोन्हीही टोकाच्या भूमिका नाकारून सार्वजनिक सत्यधर्माचा मध्यम मार्ग समाजाला दिला

Files

x7..pdf

Files (410.7 kB)

Name Size Download all
md5:d92c236a7ec70a4d7136ac8b6d14c352
410.7 kB Preview Download