Published May 30, 2024 | Version v1
Journal article Open

अहिल्याबाई होळकरांचे पर्यावरण क्षेत्रातील योगदान

Authors/Creators

  • 1. इतिहास विभाग अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारशिंगी ता.नरखेड जि.नागपूर

Description

मराठा कालखंडात जिजाबाई, येसूबाई, ताराबाई, राधाबाई, गोपिकाबाई, उमाबाई, अनुबाई, गौतमाबाई अशा कर्तबगार स्त्रियांनी प्रजेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली व इतिहासात आपले स्थान पक्के केले. याच कालखंडात भारताच्या इतिहासात ज्या कर्तुत्वशालिनी स्त्रिया होऊन गेल्या त्यात इंदोर संस्थानाच्या राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अहिल्याबाई चा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सीना नदीच्या काठी वसलेल्या चोंडी या गावात वैशाख कृष्ण सप्तमी सोमवार 31 मे 1725 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे व आईचे नाव सुशिलाबाई होते. माणकोजी हे चोंडी गावचे पाटील होते. अहिल्याबाई चे आई वडील दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी अतिशय चांगले संस्कार करून अहिल्याबाईला वाढविले. अहिल्याबाई चे शिक्षण पाच भावंडांच्या सहवासात घरीच झाले, माळव्यातील इंदोर संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर या मराठेशाहितील मातब्बर सरदाराचा पुत्र खंडूजी उर्फ खंडेरावाशी वयाच्या आठव्या वर्षी इ.स. 1733 मध्ये अहिल्याबाई चा विवाह होळकरांच्या साजेशा रीतीने थाटामाटात संपन्न झाला. विवाह नंतर सासरी अहिल्याबाईला सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न मल्हारराव होळकरांनी केला. आणि त्यांना राजकारणात तरबेज बनविले

Files

x6..pdf

Files (434.0 kB)

Name Size Download all
md5:a59f787d66c351d1eb9e9250288eb81e
434.0 kB Preview Download