"गणपतरावजी देशमुख यांची विधिमंडळ कारकीर्द - एक विकासात्मक अभ्यास"
Authors/Creators
Contributors
Researcher:
Description
प्रस्तावना:
गणपतराव देशमुख हे पुणे येथे एल. एल. बी चे शिक्षण घेत असताना वसंतराव तुळपुळे व कमलाबाई भागवत यांच्या मार्क्सवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. मार्क्सवादाचा अभ्यास करण्यासाठी गणपतराव देशमुख त्यांच्याकडे शिकवणीला जात असत. तत्कालीन काळात तुळशीदा जाधव, केशवराव जेधे व शंकरराव मोरे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले. कॉलेज मध्ये असतानाच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चळवळ उभा करून लोकजागृतीसाठी त्यांनी सभा घेतल्या. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत विद्यार्थी सभेचा कार्यकर्ता म्हणून १९५४ मध्येच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग घेतला. विद्यार्थी दशेतच चळवळीच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व दीन दलित यांचे प्रश्न त्यांनी तळमळीने समजावून घेतले, ते तेव्हाच ! मार्क्स, लेनिन यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या ठायी असून एका उदात्त ध्येयासाठी तरुण वयातच त्यांनी जे ध्येय ठरविले, त्याबाबतच्या निष्ठा इतक्या स्पष्ट आणि जबर होत्या की शेतकरी, दीन – दलित व सर्वसामान्य माणसांना न्याय द्यायचा असेल तर राज्य हे उपभोगायचे नसून तर ते जनतेच्या हितासाठी व समाज परिवर्तनासाठी चालवायचे असते. हा छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्याबाई होळकर यांचा क्रांतीकारक वसा घेऊन आपल्या समाज कार्याची मुहूर्तमेढ विद्यार्थी दशेतच त्यानी रोवली. देशात, महाराष्ट्रात आलेला लोकशाही सत्येचा प्रयोग भांडवलदार आणि जमिनदार निश्चितपणे स्वत: च्या हितासाठी करतील आणि ज्या शेतकरी, कामगारांनी असिम त्याग करून प्रसंगी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळविले. त्यांना वाऱ्यावर सोडतील अशी चिंता बाळगून समाजवादी भूमिका स्वीकारून गणपतराव देशमुख तेव्हा राजकारणाकडे ओढले गेले, ते आजतागायत !
Files
x11.pdf
Files
(443.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:f3b38a75381a3b3a3cc1998247cef77f
|
443.7 kB | Preview Download |