आदिवासी लोकसाहित्य एक अमूल्य ठेवा
Authors/Creators
- 1. सहाय्यक प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर जिला: सांगली ४१५४०९ महाराष्ट्र, भारत
Description
साहित्य हे समाजाच्या संस्कृतीचा आचार विचारांचे एक प्रतिबिंब आहे. यामध्ये चालीरीती रूढी परंपरा सामाजिक बांधिलकी या घटकांचा समावेश होतो. प्राचीन काळापासून समाजात अनेक स्थित्यंतरे झाली आहे. यामध्ये सामाजिक स्थित्यंतरात साहित्याने फार मोठी भूमिका निभावली आहे. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम साहित्य नेहमीच करत आले आहे. साहित्याच्या विशाल प्रवाहातील एक उगवता प्रवाह म्हणजे लोकसाहित्य होय. लोकसहित्याचे प्रचलन हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरेने जात असते. आदीम काळापासून चालत आलेल्या या चालीरीती रूढी-परंपरा, लोककथा, लोकगीते, निरनिराळे खेळ, जादूटोणा, ज्योतिष इत्यादींचा समावेश लोकसाहित्यातच होतो.
अदिवासीच्या लोकसाहित्याची ही वाटचाल हजारो वर्षापासूनचे आहे. आदिवासींचे लोकसाहित्याशी अतूट नाते आहे. आदिवासींनी लोकसहित्याचा हा ठेवा अजूनही जपून ठेवलेला आहे. आदिवासींचे जीवनमानाचे दर्शन त्यांच्या लोककलां मधून घडते. म्हणूनच लोककलां मधून आदिवासी लोकसंस्कृतीचे जीवन प्रतिबिंबीत झालेले दिसते.
Files
202408020610002.pdf
Files
(808.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:7a5cd9fc9284240f9178310851d44ea7
|
808.7 kB | Preview Download |