सामाजिक कल्याण आणि शाश्वतता यात शिक्षणाचे योगदान.
Authors/Creators
Description
गोषवारा:
शिक्षण हे मनुष्यालाच नाही तर अखिल विश्वाला जागरूक, सक्षम, सुसंस्कृत बनविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. शिक्षणातून समाज परिवर्तन होत असते. समाज परिवर्तन होत असताना सामाजिक हित किंवा विकास अपेक्षित असतो. हा विकास किंवा हित हे शाश्वत असावे किंवा शाश्वत व्हावे. यासाठी शिक्षणातील अनेक वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणातील अनेक नवीन ट्रेंड उद्यास येत आहे त्यातून ही शाश्वता साधता येईल. शाश्वतता जपत असताना नीतीमूल्ये, कौशल्य यांना अबाधित ठेवणे गरजेचे आहे. त्यांना धक्का लागता कामा नये यासाठी विचारात शाश्वतेचे बीज रोवले गेले पाहिजे म्हणजे ते आचारात /आचरणात येईल. आचारात आले की मग प्रचार सहज शक्य होईल. गुणवत्ता पूर्ण शिक्षण हा शाश्वत विकासाचा पाया आहे.
समाज विकासात समाज हितात शिक्षणाचा जसा मोठा वाटा आहे तसाच शिक्षणात देखील समाजाचा खूप मोठा वाटा आहे. कारण विविध सामाजिक कृती या शिक्षणातून प्रभावित होत असतात. मानवी गरजाधिष्टित शिक्षण हे समाजाला उपयुक्त ठरत असते. ‘शाश्वतता’ ही सामाजिक प्रगतीची प्रक्रिया आहे जी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय विचारांना / घटकांना एकत्रित करते. या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे दर्जेदार गुणवत्ता पूर्ण शिक्षण होय. शिक्षण ही सामाजिक कल्याणाची व शाश्वततेची गुरुकिल्ली आहे. शिक्षण हे लोकशाही मूल्ये, सामाजिक समता, आर्थिक कल्याण इत्यादींना प्रोत्साहन देते. म्हणजेच दर्जेदार शिक्षणात समाज हितोपयोगी असे मूल्यशिक्षण, लोकशाही शिक्षण, आरोग्य शिक्षण, पर्यावरण शिक्षण यांचा अभ्यास असणे नितांत गरजेचे आहे.
Files
90.pdf
Files
(617.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:033b49d6e918740e9aae719fdd247372
|
617.6 kB | Preview Download |