महात्मा गांधीजीं आणि त्याचे स्वदेशी संकल्पना
Authors/Creators
- 1. स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मुक्रमाबाद ता. मुखेड जि. नांदेड ४३१७१९ महाराष्ट्र, भारत
Description
स्वदेशी ही संकल्पना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एका टप्प्यावर महत्त्वाची ठरली होती. स्वावलंबन ही स्वदेशीशी संलग्न असलेली पण जास्त करून सार्वजनिक आर्थिक धोरणाशी संबंधित अशी संकल्पना आहे. ती अनेक विकासशील देशांनी काही वेळा वापरलेली दिसते. स्वदेशी-स्वावलंबन या जोडगोळी राजकीय वाटचाल म्हणून संबोधता येईल.
'स्वदेशी'चा अर्थ एतद्देशीय वस्तू, सुविधा, विचार, मूल्ये, यांना समाजाने प्राधान्य द्यावे असा सर्वसाधारणपणे सांगता येईल. एकोणिसाव्या शतकात जेव्हा भारतात औद्योगिक क्षेत्र जवळपास अस्तित्त्वातच नव्हते तेव्हा नव्याने उभ्या राहणार्या भारतीय उद्योगांना बाजारपेठ मिळावी म्हणून स्वदेशीचा पुरस्कार कामी आला. कारण वसाहतिक संदर्भात तेव्हाचे राज्यकर्ते त्यांच्या, म्हणजे इंग्लंडच्या आर्थिक-औद्योगिक हिताला प्राधान्य देणारी धोरणे पुढे रेटत होते. पुढे विसाव्या शतकाच्या आरंभी, या आर्थिक बाजूला राजकीय-भावनिक परिमाण दिले गेले. स्वदेशी ही 'चळवळ' बनली. म्हणजेच, राष्ट्रीय भूमिकेतून परक्या किंवा परदेशी वस्तू, उत्पादने यांच्यावर बहिष्कार टाकण्याची प्रतिकात्मक कृती आणि स्वदेशीचा वापर ही देखील एक राजकीय आणि प्रतिकात्मक कृती म्हणून स्वदेशीचा पाठपुरावा केला गेला. त्याद्वारे, आर्थिक परिणामांच्यापेक्षाही, भावनिक परिणाम साधून सामान्य व्यक्तींना सोप्या मार्गाने राजकीय प्रक्रियेत सामावून घेतले गेले.
गांधींनी स्वदेशीचा हा मुद्दा आर्थिक बाजूच्या बरोबरच तात्विक मुद्द्याशी जोडला. समाजाच्या गरजा आणि प्रचलित काळात त्या समाजाला उत्पादन करता येणार्या वस्तू/सुविधा यांची सांगड घालून त्यांनी उपभोगप्रधान जीवनपद्धतीपेक्षा वेगळ्या जीवनपद्धतीचा पुरस्कार केला. त्यांच्या विचारात साधे जीवन (कमी गरजांवर आधारलेले आयुष्य) आणि एक प्रकारचा देशीवाद किंवा स्थानिकवाद - म्हणजे स्थानिक स्थिती आणि उत्पादनक्षमता यांच्याशी जोडलेले आयुष्य, जगण्याची रीती या दोन्ही घटकांचा समावेश होता.
Files
20230104880885208.pdf
Files
(843.0 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:4d01802bd69635a44d21044f59b2d229
|
843.0 kB | Preview Download |