महात्मा गांधीजी आणि सर्वोदय
Authors/Creators
- 1. सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालय लातूर ४१३५१२ महाराष्ट्र, भारत
Description
महात्मा गांधीजींचा यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधींचे विचार आजही खूप महत्त्वाचे आणि अनेक प्रश्नांची सोडवणूक करणारे आहेत. महात्मा गांधीजींचे विचार राष्ट्रवाद, नैतिकता आणि मानवतावादावर आधारित आहे. त्यांच्या मते, ज्या अर्थकारणाला नीतिशास्त्राचा पाया नसेल तर ते अर्थकारण विनाशकारी ठरेल. नितीशास्त्राचा आधार नसलेल्या या अर्थकारणामुळे सर्वसामान्य लोकांचे हित होणार नाही तर त्यांचे शोषण होईल. समाजात विषमता वाढेल. त्यासाठी नफा आणि पैसा याला महत्त्व न देता मानव केंद्रित अर्थव्यवस्था असावी असा गांधींचा आग्रह होता. गरीब, दुर्बल वर्गाचा बळी देऊन त्यांचे शोषण करून सबल, धनसंपन्न व्यक्तीला द्रव्य संचय करण्यास समर्थ बनविणाऱ्या अर्थशास्त्राला गांधीजींचा विरोध होता. दारिद्र्य बेकारी विषमता शोषण या समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊन प्रत्येक माणसाला जगण्यायोग्य परिस्थिती निर्माण करणे हे महात्मा गांधीजींच्या आर्थिक विचाराचे उदिष्ट होते. सध्याच्या जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या या युगामध्ये दारिद्र्य, बेकारी, विषमता, शोषण या समस्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. भांडवलशाहीमुळे आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरलेला दिसून येतो. आरक्षणासाठी आंदोलने होत आहेत. उत्पादनाच्या साधने काही मूठभर लोकांच्या हाती असुन समाजातील बहुसंख्य लोक त्यापासून वंचित आहेत. भारतात मागील पाच वर्षात दीड लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरून समाजात आर्थिक विषमता किती आहे हे समजते. त्याचबरोबर जगण्यायोग्य परिस्थिती राहिली नाही हे लक्षात येते. वाढती भाववाढ, रुपयाचे अवमूल्यन, बेरोजगारी, वाढते शहरीकरण, औद्योगिक असंतुलन यासारख्या अनेक समस्या या मुक्त अर्थव्यवस्थेतून निर्माण झालेल्या दिसतात. समाजात सामाजिक आणि आर्थिक असंतुलनाचे प्रमाण खूप वाढले आहे. सध्याची अर्थनीती हे न्यायाची राहिली नाही. गांधीजींना न्यायाचे अर्थशास्त्र हवे होते. गांधीजींच्या मते राजकीय व सामाजिक दुःखावर सर्वोदय हा एक रामबाण औषध आहे. गांधींजींची सर्वोदय संकल्पना काय आहे. आणि वर्तमान काळात सर्वोदयाचा विचार समाजाला उपयोगी आहे का? याचे विश्लेषण या शोधनिबंधामध्ये केलेले आहे.
Files
20230104591596148.pdf
Files
(874.0 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:a23180266026d884f3bc7d8542d845bc
|
874.0 kB | Preview Download |