महात्मा गांधीजींच्या राजकीय विचारांचा चिकित्सक अभ्यास
Authors/Creators
- 1. संशोधक विद्यार्थी, नूतन महाविद्यालय' सेलू जि. परभणी, महाराष्ट्र
Description
संपूर्ण मानव जातीसाठी सत्य अहिंसा आणि प्रेम हा संदेश देणारे'वर्तमान परिस्थितीत संपूर्ण जगाला ज्यांच्या विचाराची नितांत गरज आहे अशा थोर महात्म्याचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी सध्याच्या गुजरात राज्यातील पोरबंदर (ब्रिटिश भारत) येथे झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. आईचे नाव पुतलीबाई होते. गुजरातच्या किनारी भागात एका हिंदू कुटुंबात गांधींचा जन्म झाला. गांधीनी इनर टेम्पल' लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले. आता दोन वर्ष राहिल्यानंतर ते 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाऱ्याच्या दाव्यासाठी गेले. ते 21वर्षे दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथमच केला. महात्मा गांधीजींच्या विचारांची सध्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण जगाला जास्त गरज आहे. गांधीजींच्या विचारानेच या देशाचे कल्याण होईल. त्यांच्या ठायी असलेली करुणा आणि निस्वार्थ भाव हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते परंतु विचारसरणी मात्र उच्च कोटीची होती. इसवी सन 1915 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी ते भारतात परतले आणि लवकरच अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. इसवी सन 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन' आर्थिक स्वावलंबन' स्त्रियांचे समान हक्क' सर्वधर्मसमभाव' अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'स्वराज्य' यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधींनी भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी रहाणी स्वीकारली. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळींसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. गांधीजी हे आजीवन सांप्रदायिकतावादाचे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इसवी सन 1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे 385 किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर इसवी सन 1942 मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध 'भारत छोडो आंदोलन' चालू केले या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात आणि भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ऑगस्ट 1947 मध्ये ब्रिटनने स्वातंत्र्य दिले परंतु ब्रिटिश भारतीय साम्राज्य हे दोन अधिराज्यांमध्ये विभागले गेले एक हिंदू-बहुल भारत आणि मुस्लिम-बहुल पाकिस्तान. अनेक विस्थापित हिंदू 'मुस्लिम आणि शीख त्यांच्या नवीन भूमित जात असताना विशेषतः पंजाब आणि बंगालमध्ये धार्मिक हिंसाचार सुरू झाला. स्वातंत्र्याच्या अधिकृत उत्सवापासून दूर राहून गांधींनी पीडित भागाला भेट दिली आणि त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काही महिन्यात त्यांनी धार्मिक हिंसाचार थांबवण्यासाठी अनेक उपोषणे केली. गांधीजींनी काही पुस्तके देखील लिहिलेली आहेत त्यांचे आत्मचरित्र 'माझे सत्याचे प्रयोग' या नावाखाली प्रकाशित झाले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर 'सत्याग्रहा इन साऊथ आफ्रिका' हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी 'हिंद स्वराज्य किंवा इंडियन होम' ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे. जॉन रस्किनच्या 'Unto This Last' चे गुजराती भाषांतर केले आहे.
Files
20230104487490127.pdf
Files
(723.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:56aa509b50f14fa6186c4ffd471533be
|
723.4 kB | Preview Download |