Published October 27, 2023 | Version v1
Journal article Open

महात्मा गांधी : असहकार चळवळ

  • 1. इतिहास विभाग, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर जि. लातूर ४१३५१७ महाराष्ट्र, भारत

Description

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या व राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासात 1920 ते 1948 या कालखंडाला 'गांधीयुग' असे म्हणतात. या काळात राष्ट्रीय आंदोलनाची संपूर्ण सुत्रे म.गांधीकडे होती. याचा अर्थ यावेळी प्रभावी व लोकप्रिय असे इतर नेते नव्हते असे नाही. पण संपूर्ण देशात व काँग्रेस गांधीकडे पूर्णपणे आकृष्ट झाली होती. गांधीजींकडे अशी काही चुंबकीय शक्ती होती की, सर्वच भारतीय त्यांच्याकडे खेचले गेले होते. गांधीजींचा शब्द म्हणजे काँग्रेसचा शब्द अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टिळकांचा 1920 मध्ये मृत्यू झाला होता. सरकारने केलेल्या दडपशाहीमुळे जहालवादी चळवळीचे खच्चीकरण झाले होते. अशा बिकट परिस्थितीत भारतीय लोकांच्या आशा-आकांक्षा व इच्छांना वळण लावणारा कणखर नेता आवश्यक होता आणि ही गरज म.गांधींनी भरून काढली. 

भारतात असहकार आंदोलन सुरू करून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनातील नव्या युगाची सुरुवात केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलन सुरू करण्याचे ठरले. पण याच दिवशी टिळकांचाही मृत्यू झाला. त्यामुळे हा दिवस विचित्र योगायोगाचा होता. टिळकांचा मृत्यू व गांधीयुगाची सुरुवात हे गणितच नियतीने मांडून ठेवले होते की काय असे वाटल्याशिवाय राहत नाही.

Files

20230104439444116.pdf

Files (652.9 kB)

Name Size Download all
md5:07f1a3170bd298a4bcbbcba7584861e5
652.9 kB Preview Download